प्रतिनिधी, / पिपोडे बुद्रुक/ अभिजीत लेंभे उत्तर कोरेगाव तालुक्यात बाजारपेठ असलेल्या पिंपोडे बुद्रुक गावालागेल्या अनेक महिन्यांपासून गावात पोलीस पाटील पद रिक्त असल्याने विविध प्रशासकीय आणि कायदा-सुव्यवस्थेच्या कामांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. पोलीस पाटील नसल्यामुळे शासनाच्या विविध दाखल्यांसाठी, स्थानिक वाद मिटविण्यासाठी तसेच पोलिसांना आवश्यक माहिती पुरविण्यासाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.गावातील नागरिकांनी अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही अद्याप या पदाची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे, शासकीय योजनांची माहिती पोहोचविणे आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी समन्वय साधणे कठीण झाले आहे.“गावाला तातडीने पोलीस पाटील मिळावा, जेणेकरून नागरिकांची कामे सुरळीत होतील,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. Post navigation आटपाडी येथे होलार समाज कार्यालयाचे उद्घाटन…. आटपाडीचे ‘लक्षतारा न्यूज’चे संपादक सचिन वाघमारे यांना प्रतिष्ठित ‘शब्दवेध गौरव पुरस्कार’ जाहीर