आटपाडीत ‘होलार समाज विकास प्रतिष्ठान’ व ‘पुरोगामी होलार संघटने’च्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन; ज्येष्ठ साहित्यिक विलास खरात यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती आटपाडी (प्रतिनिधी):येथील होलार समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक प्रगतीला गती देण्यासाठी ‘होलार समाज विकास प्रतिष्ठान’ आणि ‘पुरोगामी होलार संघटना, महाराष्ट्र राज्य’ यांच्या आटपाडी (जि. सांगली) येथील नूतन कार्यालयाचे आज, दिनांक १ जुलै २०२६ रोजी उत्साहात उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमाला वर्धा येथील २ दिवसीय कवी संमेलनाचे अध्यक्ष, अनेक पुरस्कारांनी सन्मानित ज्येष्ठ साहित्यिक आयु. विलास खरात यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव गुळीग, राज्य सचिव नंदकुमार हातीकर यांच्यासह आनंद ऐवळे, दत्ता कांबळे, यल्लाप्पा पवार, सुनील हातीकर, भूमिका हातीकर आणि अंजना ऐवळे आदी मान्यवर उपस्थित होते.गुणवंतांचा गौरव आणि सत्कार सोहळाकार्यालय उद्घाटनाचे औचित्य साधून समाजातील गुणवंतांचा विशेष सत्कार करण्यात आला.भूमिका हातीकर: समाज कल्याण विभाग, सांगली यांच्या वतीने ‘राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती’ मिळाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.आयु. विलास खरात व यल्लाप्पा पवार: समाजात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक विलास खरात आणि यल्लाप्पा पवार यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.”हे कार्यालय आगामी काळात समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय आणि हक्क पोहोचवण्यासाठी, तसेच तरुणांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी हक्काचे केंद्र ठरेल,” असा विश्वास याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राज्य सचिव नंदकुमार हातीकर यांनी मानले. अत्यंत उत्साही आणि सकारात्मक वातावरणात हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. Post navigation कृषी दिनानिमित्त क्रांतिवीर शाळेचे विद्यार्थी शेतकऱ्याच्या बांधावर पिपोडे बुद्रुकला मिळेना हक्काचा पोलीस पाटील; नागरिकांमध्ये नाराजी