​’आर्यारवी एंटरटेनमेंट’चा दादर येथील भव्य सोहळ्यात होणार गौरव; आटपाडी व माणदेश परिसरात आनंदाचे वातावरण
​आटपाडी/माणदेश:
‘आर्यारवी एंटरटेनमेंट’च्या वतीने आयोजित पहिल्या ‘पत्रकार, मुक्त पत्रकार, संपादक, कला, साहित्य आणि समाजसेवक पुरस्कार सोहळा २०२६’ ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल ‘लक्षतारा न्यूज’चे मुख्य संपादक सन्माननीय श्री. सचिन वाघमारे यांना या वर्षाचा अत्यंत मानाचा ‘शब्दवेध गौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
​सिने-नाट्य अभिनेते, दिग्दर्शक आणि ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय श्री. महेश्वर भिकाजी तेटांबे यांच्या आयोजनाखाली हा भव्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा मुंबईत संपन्न होत आहे.
​निर्भीड पत्रकारितेचा बहुमान
​श्री. सचिन वाघमारे यांनी ‘लक्षतारा न्यूज’च्या माध्यमातून आटपाडी तालुक्यासह संपूर्ण माणदेश परिसरातील ग्रामीण जनतेचे प्रश्न, सामाजिक समस्या आणि विकासात्मक मुद्दे सातत्याने लावून धरले आहेत. त्यांच्या याच लोकभिमूख आणि निर्भीड पत्रकारितेची दखल घेऊन ‘आर्यारवी एंटरटेनमेंट’ने त्यांना या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवडले आहे. त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने आटपाडीच्या पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा मोठा वर्षाव होत आहे.
​’शब्दवेध गौरव’ पुरस्काराचे अन्य मानकरी:
​या सोहळ्यात संपादक सचिन वाघमारे यांच्यासोबतच महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनाही गौरविण्यात येणार आहे:
१) श्री. शरद बनसोडे (पत्रकार, कवी, समाजसेवक)
२) प्रा. आश्विनी शिवाजी काळे (प्रसिद्ध लेखिका, कवयित्री)
३) श्री. मिर्झागालीब रज्जाक मुजावर (संपादक – दै. तुफान क्रांती)
४) श्री. श्रीकांत दत्ताराम म्हात्रे (संपादक – सा. अंतिम सत्य)
५) श्री. विजय रंगनाथ टाकणे (संपादक – माणदेश न्यूज)
​पुरस्कार सोहळ्याचे तपशील:
​दिनांक व वेळ: रविवार, १२ जुलै २०२६ | सकाळी ठीक ९:३० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत.
​ठिकाण: सुरेंद्र गावस्कर हॉल, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर (पूर्व), मुंबई – ४०००१४.
​सचिन वाघमारे यांना मुंबईत होणाऱ्या या दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार असून, आटपाडी व माणदेश परिसरातील विविध स्तरांतील नागरिक, पत्रकार आणि मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *