सोलापूर वृत्तसेवा …

आज सोलापूर येथे लोकसभा खासदार यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्रा) शिष्टमंडळाने भेटून सन 2013 पूर्वी नियुक्त शिक्षकांना TET परीक्षेतून मुक्त करण्यासाठी संसदेत विधेयक आणून कायदा पारित करण्यात यावा या विषयाचे निवेदन दिले.
RTE Act 2009 नुसार TET बंधनकारक नसताना माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार देशातील सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा उतीर्ण होणे बंधनकारक केलेले आहे.त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद( प्रा)च्या वतीने महाराष्ट्रातील सर्व पक्षीय खासदार महोदयांना निवेदन देऊन या संदर्भात येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडून 2010 पूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटी परीक्षेतून सूट देण्यात यावी व त्यांच्या सेवाना संरक्षण देण्यात यावे या संदर्भात निवेदन देण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज खासदार प्रणिती ताई यांना निवेदन देण्यात आले.यावेळी मा प्रणिती ताईंनी येत्या पावसाळी अधिवेशनात हा महत्वपूर्ण विषय मांडणार असल्याचे सांगुण सकारात्मक प्रतिसाद दिला.
या प्रसंगी शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद( प्रा) चे पुणे विभाग संयोजक डॉ. श्री. सचिन लादे, सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री. सुनिल जगताप, श्री धनप्पा धनशेट्टी, श्री. अंबादास खराडे,श्री दत्तात्रय येडगे, श्री भारत पाटील, श्री महादेव भोसले
उपस्थित होते*..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *