भाळवणी प्रतिनिधी पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामपंचायत कार्यालयात युनियन बँकेचे नूतन शाखाधिकारी प्रशांत आवताडे यांचा सत्कार पंचायत समिती सदस्य विजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच नुतन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे भाळवणी केंद्र प्रमुख सतीश शिंदे यांचा पांडुरंगचे माजी संचालक हरिभाऊ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी सरपंच रणजित जाधव, युवा उद्योजक शकील काझी,प्रशांत माळवदे, बापू वाघमारे, सोमनाथ पाटील,राजाभाऊ शिंदे, राहुल शिंदे, कल्याण गवळी,हर्षद गवळी, विलास लाले आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आभार ग्रामविकास अधिकारी डी एस वाघमारे यांनी आभार मानले. Post navigation कोथळी येथील प्रतिभा निकेतन विद्यालयास रोटरी क्लबकडून स्मार्ट टीव्ही भेट सोलापूर येथे खासदार प्रणितीताई शिंदे यांची शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन दिले निवेदन.