वडूज/ प्रतिनिधी विनोद लोहार
        खटाव तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतनाचा फरक अदा केला जात नाही. तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम ८.३३% कर्मचारी हिस्सा जमा केला जात असतो मात्र ग्रामपंचायतीचा हिस्सा ४.१६% ने भरला जात असल्याची बाब गंभीर आहे. यामुळे तालुक्यातील कर्मचाऱ्यांना वार्षिक ६ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याने आज खटाव तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेने खटाव पंचायत समिती समोर बेमुदत आंदोलन उभारले होते.
      आंदोलन दरम्यान जिल्हा परिषदेचे सदस्य अनिलभाऊ देसाई यांनी आंदोलन ठिकाणी भेट दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले आज याठिकाणी जे आंदोलन केले जात आहे यातील मागण्या या तुमच्या हक्काच्या आहेत. त्या मागण्या मान्य झाल्याचं पाहिजेत. जिल्हा परिषदेच्या पातळीवर हा विषय घेऊन आपल्या काही मागण्या असतील याचा आपण स्वतः पाठपुरावा करू . यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर श्री देसाई यांनी गटविकास अधिकारी योगेश कदम यांना संपर्क साधून आंदोलन स्थळी बोलावले.
     यावेळी ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकारी यांच्या समक्ष सकारात्मक चर्चा करून आज याठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत आंदोलक यांच्या मागण्या मान्य करून  लेखी आश्वासन देण्यात आले. तसेच या कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक अडचणी आपण सोडवून त्यांना न्याय देणार असल्याचे आश्वासन श्री देसाई यांनी दिले.
   यावेळी जिल्हाध्यक्ष जे की काळे,  तालुकाध्यक्ष रामदास वाघचौडे, राजन शिंगाडे, गणपत वाघचौडे, जावेदभाई पठाण, नवनाथ आवळे, प्रशांत सावंत, अमोल काळोखे, विद्या निंबाळकर, जयश्री भोसले आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनस्थळी जिल्हा परिषद सदस्य संदीप मांडवे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे प्रमुख पदाधिकारी यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. एवढा वेळ देणारा पहिलाच नेता…
आंदोलनस्थळी दाखल झाल्यानंतर बराच वेळ जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई हे ग्रामपंचायत कामगार सेनेच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा करत होते. यावेळी आंदोलक आपणावर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचत होते. बऱ्याच वेळ चर्चा झाल्यानंतर श्री देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले. तदनंतर काही कार्यकर्त्यांनी देसाई भाऊ आपण पहिलाच असा नेता असाल की खूप वेळ आमच्यासाठी दिला असे म्हणत त्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *