(अजित जगताप).
पाचगणी दि: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी खोऱ्यातील प्रत्येक गाव हे एक वैशिष्ट्य आहे. इतिहास आहे. ज्या ठिकाणी दळणवळणाचे साधन नाही. आज त्याच कावडी गावात मोफत दळण दळून मिळत असल्याचा चमत्कार घडवून आणला आहे. ही किमया कावडी ग्रामस्थ आणि सर्व मानकुमरे बंधू यांनी करून दाखवली आहे. त्यामुळे कावडी गाव हे पर्यटकांना पर्यटकांची आवडीचे ठिकाण झाले आहे.
कुडाळ- पाचगणी रस्त्यावरील जावळी तालुक्यातील महू- हातगेघर धरणामुळे विस्थापित झालेल्या या परिसरातील अनेक गावांचे पुनर्वसन फलटण, खंडाळा, सातारा, कराड या परिसरात झालेले आहे. कोयना व कण्हेर धरण निर्मितीने तालुक्यातील भूमिपुत्रांना आपल्या वाड वडिलांच्या जमिनी- घर सोडून दुसरीकडे जावे लागले आहे. काहींनी पर्याय शोधून याच भागात आपल्या जोरावर अक्षरशः नंदनवन फुलवले आहे. आज जावळी तालुका विकासाची गंगा निर्माण झालेली आहे. धरण उशाला… आणि कोरड घशाला.. हे दिस जातील.. चांगले दिस येतील. असं करून दाखवले आहे.
कावडी गावचे सुपुत्र आणि सातारा जिल्ह्यातील भाजप नेते सातारा जिल्हा परिषद सदस्य आदरणीय वसंतराव ज्ञानदेव मानकुमरे यांच्या कुशल नेतृत्वाखाली कावडी ग्रामस्थांनी क्रांती करून दाखवलेली आहे. श्रमदानातून सर्व ग्रामस्थांनी हम भी कुछ कम नही.. अशी जिद्द ठेवली. सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजूभैया भोसले, उद्योजक मोहन मानकुमरे, अँड.बापूसाहेब मानकुमरे, सर्व कावडी ग्रामस्थ यांची समर्थ साथ लाभली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे. चारशे लोकवस्ती असलेल्या हातगेघर धरण काठावरील व डोंगर पायथ्याशी असलेल्या कावडीने खऱ्या अर्थाने आपल्या गुणवत्तेची कावड खुली करून दाखवलेली आहे. मनाचा मोठेपणा आणि मनगटातील श्रमाची ताकद याचे मिश्रण म्हणजेच निसर्गरम्य कावडी गाव उभे राहिले आहे. गाव करील ते राव सुद्धा सामील होऊन करू शकतात. हे कावडीकरांनी दाखवून दिले आहे. आज अनेक पर्यटक सुद्धा पाचगणी- महाबळेश्वर ला जाताना एक आदर्श गाव म्हणून कावडी गावाला भेट देत आहेत. कावडी ग्रामपंचायतच्या मालकीचे कावडी उपाहारगृहातील गरम गरम भजी आणि चहाचा घोट घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने समृद्धी गाव काय असते? हे अनुभवातून दिसून येत आहे. मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानांतर्गत गावातील विकासाची कामे पाहून गावपण टिकवण्याचा समाधान वाटत आहे. नाना नानी पार्क, व्यायाम शाळा, वृक्ष लागवड, ठिबक सिंचन, प्लास्टिक बंदी, सुसज्ज गटार कचऱ्याचे निर्मूलन, ज्ञान भंडारासाठी ज्ञानवर्धिनी, ई कार्य प्रणाली, सामाजिक सभा मंडप, पिठाची गिरणी, कला व आर्ट गॅलरी, सौर ऊर्जा, सोलर सिस्टिम, सीसीटीव्ही कॅमेरा, यशोगाथा वाचनालय, महिला बचत गटासाठी स्वतंत्र कार्यालय, वसंत सागर कृषी पर्यटन आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले क्रीडा संकुल, सुसज्ज स्मशान भूमी, भैरवनाथ मंदिर, बुद्ध विहार, अंतर्गत सुसज्ज रस्ते, वॉश बेसिन, पारस बाग, शेतकऱ्यांसाठी गट शेती, दगडी बंधारे, बोट क्लब आणि विशेष म्हणजे गावातील मुली महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोफत सॅनिटरी नॅपकिन तसेच सर्वांसाठी स्वच्छ एक रुपयांमध्ये एक लिटर पाण्याचा पुरवठा आणि कापडी पिशवी या उपक्रमाने खऱ्या अर्थाने भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. मी माझ्या देशावर प्रेम करतो. अशा पद्धतीने कावडी गावावर प्रेम करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. याच गावासाठी झटणारे आदी मान्यवर मंडळी खऱ्या अर्थाने गावदूत ठरलेले आहेत. सर्वाधिक निश्चितच कावडी गावाला भेट देऊन त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करावा. अशी अपेक्षा ह भ प दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेचे चेअरमन विक्रम भिलारे , अशोक गोळे, माहिती अधिकार कार्यकर्ते व पाचगणी हॉटेल व्यवसायिक डॉ. विजय दिघे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाशभाऊ भोसले, ज्येष्ठ पत्रकार रविकांत बेलोशे ,ह.भ.प. लक्ष्मण धनावडे, प्रकाश परामणे, हरीश गोळे यांनी केली आहे.


चौकट – कावडी गावासाठी मनापासून झटणारे ग्रामपंचायत कावडी
ग्रामसेवक मंगेश शिंदे,यशवंत मानकुमरे सरपंच, शशिकांत मानकुमरे उपसरपंच , प्रफुल्ल सपकाळ ,महेश मानकुंबरे,वैभव मानकुंबरे ,शंकर रामू मानकुंबरे ,जगन्नाथ शिराळे ,भीमराव मानकुंबरे,लक्ष्मण धनवडे
शालेय शिक्षक- शिक्षिका
आशा सेविका, अंगणवाडी सेविका,
मुंबई स्थित कवडी गावातील रहिवासी यांचे श्रम मला आता प्रतिष्ठा मिळाली आहे. या गावाला निश्चितच पुरस्कार मिळेल असे अनेकांनी या गावाला भेटी दिल्यानंतर मनोगत व्यक्त केले आहे.


फोटो– कावडी तालुका जावळी येथील निसर्गरम्य परिसरातील विकास कामांचे सौंदर्य फुलले आहे (छाया- अजित जगताप, पाचगणी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *