पिंपोडे बुद्रुक /प्रतिनिधी/अभिजीत लेंभे

पर्यावरण संवर्धन व वृक्षलागवडीबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने तडवळे सं.वा. चे सरपंच श्री नानासो बडेकर यांच्या उपस्थितीत जि. प. प्राथमिक शाळा तडवळे (सं. वा.) येथे सीडबॉल (Seed Ball) निर्मिती व वितरण उपक्रम उत्साहात पार पडला.

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी माती, शेणखत व विविध देशी वृक्षांच्या बियांचा वापर करून मोठ्या प्रमाणात सीडबॉल तयार केले. तयार केलेले सीडबॉल पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरातील मोकळ्या जागा, डोंगर उतार व वनक्षेत्रात टाकण्यात येणार आहेत. यामुळे पर्यावरण संरक्षणास चालना मिळण्यास मदत होणार आहे.

यावेळी मुख्याध्यापक श्री संजय लेंभे तसेच सर्व शिक्षकवृंद सर्वश्री अरविंद निकाळजे,उद्धव पवार, निसार आतार,महेश निंबाळकर व अक्षय गुंड यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत “एक विद्यार्थी – अनेक वृक्ष” हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होऊन वृक्षसंवर्धनाची भावना अधिक दृढ झाली. ग्रामस्थांनीही शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *