प्रतिनिधी विनोद लोहार वडूज: खटाव तालुक्यातील शून्य ते पाच वयोगटातील एकूण १७ हजार ७४५ बालकांना उदी व डोस देण्यात येणार असल्याची माहिती सभापती वनिता दुबळे यांनी दिली.खटाव तालुक्यात पोलिओ लसीकरणासाठी एकूण २०२ लसीकरण बुथ उभारण्यात आले आहेत. रविवार दिनांक २८ रोजी सर्व शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांसाठी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत जवळच्या लसीकरण बूथ वर लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. याबाबत तालुकास्तरीय टास्क फोर्सचे बैठक तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून गटविकास अधिकारी व सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी मोहिमेच्या तयारीबाबत संबंधितांकडून आढावा घेतला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी युन्नुस शेख यांनी दिली.तरी संबंधित पालकांनी रविवार दिनांक २८ रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू लसीकरण बुथवर जाऊन बालकांना पोलिओचे डोस देण्यात यावेत असे आव्हान गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी केले आहे. Post navigation सातार्यात खा.संजय पाटलांचा निषेधएसपींना निवेदन: गुन्हा दाखल करण्याची मागणी तडवळे येथील शाळा स्तरावर सीडबॉल उपक्रम उत्साहात संपन्न