सातारा –
पत्रकारांना धमकी दिल्‍याप्रकरणी शिवसेनेत प्रवेश केलेले खा. संजय दिना पाटील यांचा सातार्‍यातील पत्रकारांनी जाहीर निषेध नोंदवला. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांना भेटून खा. संजय पाटील यांच्यावर गुन्‍हा दाखल करण्याची मागणी केली.

महाराष्‍ट्र शासनाच्‍या पुणे विभागीय अधिस्‍वीकृती समितीचे अध्‍यक्ष तथा सातारा जिल्‍हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, मार्गदर्शक विनोद कुलकर्णी या दोघांच्या सूचनेनुसार सातारा जिल्‍हा पत्रकार संघ, सातारा पत्रकार संघ, डिजिटल मीडिया परिषदेच्यावतीने निवेदन देण्यात आले.

सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे यांनी एसपी निखिल पिंगळे यांना घडलेल्‍या घटनेची माहिती दिली. खा.संजय दिना पाटील यांनी दि. २५ जून रोजी पत्रकारांबद्दल अपशब्द वापरुन थेट धमकी दिली. हा सर्व प्रकार रेकॉर्ड झाला आहे. पत्रकारांबद्दल केलेले वक्‍तव्‍य निंदनीय आहे. यामुळे सातार्‍यातील पत्रकारांच्यावतीने जाहीर निषेध व्‍यक्‍त करत त्‍यांच्यावर गुन्‍हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे, डिजिटल मीडिया परिषदेचे राज्याचे कार्याध्यक्ष संतोष (सनी) शिंदे, डिजिटलचे जिल्हा सचिव पद्माकर सोळवंडे शहराध्यक्ष प्रतीक भद्रे, पत्रकार संघाचे पदाधिकारी ज्ञानेश्‍वर भोईटे, उमेश बांबरे, अमित वाघमारे, अजित जगताप, प्रवीण शिंगटे, विनीत जवळकर, संदीप राक्षे, रिझवान सय्यद, जावेद खान, प्रमोद इंगळे, संजय शिंदे, गौरी आवळे, मीना शिंदे, अभिजीत माने, सचिन सापते, पलाश जवळकर, आर.डी.भोसले, मंगेश कुंभार, स्‍वप्‍नील गवाळे तसेच छायाचित्रकार, पत्रकार उपस्‍थित होते.

फोटो कॅप्शन – साताऱ्यातील पत्रकारांनी खा. संजय दिना पाटील यांचा निषेध केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *