(अजित जगताप)
पाचगणी दि: जेव्हा प्रशासनातील सत्य ज्यांच्या समोर आणायचे असेल तर माहितीचा अधिकार हे खूप मोठे न्यायालयासारखे हत्यार आहे हा माहिती अधिकार वाचवण्यासाठी जनआंदोलनाची गरज आहे असे प्रतिपादन राईट टू इन्फॉर्मेशन इंडिया संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष व माहिती अधिकार पुस्तकाचे लेखक अँड .डॉ. विजय दिघे यांनी पाचगणी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.
नवी दिल्ली येथील जंतर-मंतरवर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे शेकडो आंदोलन करून माहितीचा अधिकार ( आर टी आय) हा एक कायदा देशवासीयांसाठी दिलेला आहे. तो भारतीय लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. या कायद्यामुळे सामान्य नागरिकाला शासनाकडे प्रश्न विचारण्याचा, सार्वजनिक निधीचा हिशोब मागण्याचा अधिकार हातात आलेला आहे. आणि भ्रष्टाचार उघड करण्याचा अधिकार मिळाला आहे. गेल्या दोन दशकांत या कायद्यामुळे देशभरातील हजारो घोटाळे उघडकीस आले आहेत . अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे. काही घोटाळे सरकारनेच उघड केले नाहीत. गोपनीयता नावाखाली अनेक माहिती दडवली जात आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे माहिती अधिकारातून मिळालेली माहिती दिल्यास अनेक गुन्हे दाखल करण्यास हातभार लागणार आहे. ही वस्तुस्थिती जनतेला सुद्धा अपेक्षित आहे. परंतु, लोकशाही प्रक्रियेमध्ये काही बंधने पाळणे आवश्यक आहे. त्याचा फायदा कोणी घेऊ नये . असाही इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

महाराष्ट्रात माहिती अधिकार नियमांमध्ये करण्यात आलेल्या काही बदलांबाबत अनेक माहिती अधिकार कार्यकर्ते, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. देशभर मोठी आंदोलन होत आहेत. सातारा जिल्ह्यातही आंदोलन झाले आहे. माहिती अधिकार अर्ज शुल्क वाढवणे, काही अतिरिक्त अटी लागू करणे. किंवा नागरिकांसाठी प्रक्रिया अधिक कठीण करणे. यामुळे माहिती मिळवणे अवघड होऊ शकते. त्यामुळे माहिती अधिकाराचा मूळ उद्देश बाधित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. माहिती अधिकाराचा कायद्यात शिथिल करण्याचा हा प्रकार आहे. त्याचा राईट टू इन्फॉर्मेशन इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष व माहिती अधिकार पुस्तकाचे लेखक व अभ्यासू व्यक्तिमत्व अँड. डॉ. दिघे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला सडेतोड उत्तर दिली. आकडेवारीनुसार माहिती अधिकाराने देशातील कोट्यावधी रुपयाची संपत्ती वाचवली असल्याचेही त्यांनी दाखवून दिली आहे.

याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि माहिती अधिकार कार्यकर्ते अँड .डॉ. विजय दिघे यांनी यापूर्वी सातत्याने स्पष्ट भूमिका मांडली आहे. एक प्रकार या अधिकाराचा हक्क भंग राज्य सरकार करत आहेत. त्यांनी माहिती अधिकार सक्षम करण्यासाठी व अधिक सुटसुटीत व्हावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून बाबत राज्य सरकारच्या प्रतिनिधीशी लवकरच चर्चा केली जाईल. नंतर पुढील महिन्यात सर्वांना सोबत घेऊन जन आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. असेही त्यांनी नमूद केले आहे.

माहिती अधिकाराचा प्रभावी वापर करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने अर्ज करणे थांबू नये. मिळालेल्या सत्य माहितीची पडताळणी करावी, अपूर्ण माहिती असल्यास प्रथम व द्वितीय अपील करावे, आवश्यक असल्यास संबंधित सक्षम प्राधिकरणाकडे तक्रार करावी आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे कायदेशीर मार्गाने पुढे न्यावीत. या प्रक्रियेमध्ये कुणी खंड पाडू नये. जर कुणाला काही अडचणी येत असेल तर त्यांनी अँड. डॉ. दिघे यांचे विनामूल्य मार्गदर्शन घ्यावे. असे त्यांनी सूचत केले आहे

मजबूत माहिती अधिकार… लोकशाही करे पुकार.. पारदर्शक प्रशासन आणि भ्रष्टाचारमुक्त निरासन झाले पाहिजे. यासाठी रस्त्यावर उतरण्यास माहिती अधिकाराचे सर्वच सहकारी सिद्ध झाले आहेत. त्यासाठी राईट टू इन्फॉर्मेशन इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय पातळीवर अँड .डॉ. विजय रघुनाथ दिघे मोर्चा बांधणी करत असून त्यांना उदंड प्रतिसाद लाभत आहे. याबाबत पाचगणी येथील पाचगणी टेन्ट रिसॉर्ट हॉटेलमधील पत्रकार परिषदेमध्ये अनेक माहिती अधिकार कार्यकर्त्यांनीही अँड . डॉ.दिघे यांच्या भूमिकेचे स्वागत करून त्यांना जाहीर पाठिंबा दिला.


फोटो – माहिती अधिकार पुस्तकाचे लेखक डॉक्टर विजय दिघे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *