“..श्री बाबामहाराज आर्वीकर” संत सेवा साहित्य पुरस्कारासाठी
इच्छुकांनी आपले प्रस्ताव 10जुलै अखेर सादर करावेत..

सोलापूर वृत्तसेवा
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा सोलापूर व संत श्री बाबामहाराज आर्वीकर यांच्या भक्ताच्या वतीने यावर्षी आम्ही संत साहित्याचा ” सद्धर्माचे उद्गाते व महायात्रिक श्री बाबामहाराज आर्वीकर संत सेवा साहित्य पुरस्कार” सुरू करत आहोत.
हा पुरस्कार रुपये ११०००/, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ अशा स्वरूपाचा आहे.. या पुरस्काराची माहिती खालील प्रमाणे आहे, तरी
या पुरस्काराची बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात द्यावी ही नम्र विनंती ..

प्रा डॉ श्रुती श्री. वडगबाळकर
अध्यक्ष, मसाप, सोलापूर
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा: सोलापूर व श्री संत बाबामहाराज आर्वीकर यांच्या भक्ताच्या वतीने यावर्षीपासून संत साहित्याचा एक पुरस्कार सुरू करत आहोत.. हा पुरस्कार ” संतधर्माचे उद्गाते व महायात्रिक श्री बाबामहाराज आर्वीकर संत सेवा पुरस्कार” असा असणार आहे. हा पुरस्कार संत साहित्याच्या अभ्यासकाला, साहित्यिकाला देण्यात येणार आहे. ज्यांचे संत साहित्यविषयक लेखनकार्य आहे, त्याचबरोबर श्री बाबा महाराज आर्वीकर यांच्या विचारावर, तत्त्वज्ञानावर ज्यांची श्रद्धा आहे. अशा एका व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. १) या पुरस्काराचे स्वरूप रुपये ११०००/ , सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे आहे.. हा पुरस्कार दरवर्षी गुरुपौर्णिमेला देण्यात येणार आहे..
२) हा पुरस्कार केवळ संत साहित्य विषयक ग्रंथलेखन करणाऱ्या व्यक्तीला दिला जाईल.
३) या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवताना आपली संत साहित्य विषयक असलेली किमान दोन ते पाच पुस्तके , आपला परिचय व फोटो पाठवावा लागेल.
४) पुरस्कारासाठी पाठवलेली पुस्तके कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही
५) पुरस्काराची निवड परीक्षक समितीकडून करण्यात येईल. सदर समितीचा निर्णय अंतिम व सर्वांनाच बंधनकारक राहील.
६) पुरस्कार स्वीकृतीसाठी साहित्यकाराने स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रतिनिधींना पाठवू नये .. पुरस्कारर्थीनी त्यांच्या जाण्या येण्याची व राहण्याची व्यवस्था स्वतःच करायची आहे.. तो खर्च दिला जाणार नाही.
७) पुरस्कारासाठी पाठवण्यात आलेली पुस्तके मागील दहा वर्षातील असावीत.
८) पुरस्कार वितरण सोहळा सोलापूर येथे होणार आहे. तेथे उपस्थित राहणे आवश्यक आहे.‌
९) सदर पुरस्कारासाठी आपला प्रस्ताव परिचयासह ( आपले संतसाहित्य विषयक इतर कार्य असेल तर त्यासह) व पुस्तकासह खालील पत्त्यावर 10 जुलै पर्यंत पाठवावा.
नंतर आलेल्या प्रस्तावाचा विचार करण्यात येणार नाही..
पत्ता
श्री. किशोर चंडक,
कार्याध्यक्ष, मसाप, सोलापूर. मंत्री चंडक कार्यालय. जवाहरलाल नेहरू वसतिगृह पार्क चौक, सोलापूर.४१३००१
अधिक माहितीसाठी संपर्क
अध्यक्ष, प्रा डॉ श्रुती श्री. वडगबाळकर. सोलापूर
९३२५०४६४१५
प्रमुख कार्यवाह – डॉ. नरेंद्र काटीकर
९४२२६४४२४६
अध्यक्ष/ पदाधिकारी/ कार्यकारणी सदस्य. म. सा.प.पुणे शाखा, सोलापूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *