स्व.रामचंद्र कृष्णा राजमाने यांच्या स्मृती प्रित्यर्थ वडजल येथे अभ्यासिकेचे भुमीपूजन

म्हसवड वृत्तसेवा
स्वर्गीय रामचंद्र कृष्णा राजमाने यांच्या स्मृती प्रित्यर्थ बांधण्यात येणाऱ्या अद्यावत अभ्यासिकेचा वडजल व परिसरातील विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल व भविष्यात ही मुले अधिकारी बनून गावाचे नाव मोठं करतील असे उद्गार उद्योजक पांडुरंग राजमाने यांनी काढले
पुणे येथील उद्योजक पांडुरंग राजमाने व पांडुरंग राजमाने व हरिदास राजमाने या बंधूनी स्वर्गीय वडील रामचंद्र कृष्णा राजमाने यांच्या स्मृती प्रित्यर्थ वडजल येथे अद्यावत अभ्यासिका बांधण्यात येणार असून त्याचे भुमीपुजन सरपंच धनंजय जाधव व मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ब्रह्मदेव काटकर इंजि.चंद्रकांत काटकर उद्धव काटकर प्रकाश काटकर चंद्रशेन काटकर संजय राजमाने गोविंद काटकर किसनराव काटकर हनुमंत काटकर आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी पुढे बोलताना राजमाने म्हणाले माझे वडील स्वर्गीय रामचंद्र राजमाने यांनी जे संस्कार घालून दिले व कुटुंबासाठी जे अहोरात्र कष्ट केले व चांगले संस्कार घालून दिले त्याच्यामुळेच आम्ही आज घडलो असून यामध्ये वडजलगावचा ही सिंहाचा वाटा आहे आपण समाजाचे देणे लागतअसून वडिलांच्या स्मृतिपित्यर्थ भविष्यात वडजल परिसरातील मुलांना त्यांचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी अद्यावत अभ्यासिका बांधून देण्यात येणार असून या अभ्यासिकेच्या माध्यमातून या परिसरातील मुलांना त्याचा निश्चित फायदा होईल व हीच मुले भविष्यात अधिकारी बनून आपल्या भागाचा कायापालट करतील असा विश्वासही राजेमाने यांनी यावेळी व्यक्त केला
या कार्यक्रमास सुहास काटकर मारुती काटकर महादेव काटकर नामदेव काटकर दशरथ काटकर अनिल काटकर शंकर काटकर वसंत काटकर ऋषिकेश काटकर रामभाऊ जाधव दादासाहेब काटकर विठ्ठल जाधव महेंद्र वाघमारे सोमनाथ वाघमारे जयराज तुपे गौरव काटकर शहाजी काटकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *