सातारा दि:

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा जतन करण्यासाठी रिपब्लिकन सेना संपूर्ण महाराष्ट्रात क्रांतिकारक पाऊल टाकत आहे. त्याचाच भाग म्हणून सातारा जिल्ह्यातील पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांसाठी रविवार दिनांक २१ जून रोजी सकाळी साडेअकरा वाजता रिपब्लिकन सेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या निवडी सातारा शहरात घेण्यात आल्याची माहिती रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
सातारा जिल्ह्यातील अनेक जातीधर्मातील कार्यकर्ते रिपब्लिकन सेनेचे सेना प्रमुख आनंदराज आंबेडकर प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सुशील कुमार सूर्यवंशी, युवा नेते अँड अमन आनंदराज आंबेडकर, युवा नेते साहिल आनंदराज आंबेडकर, सचिव सोमनाथ भोसले यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील शेकडो भीमसैनिक तयार झालेले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून मतांचा अधिकार दिला. परंतु, आज समाजातीलच काही प्रस्थापित वर्ग हे इतर पक्षाची तळी उचलत आहेत. त्यांचा स्वाभिमान जागा करण्यापेक्षा त्यांना डावलून स्वातंत्ररीत्या दलित- पददलित- कष्टकरी- वंचित आणि उपेक्षित समाजाला न्याय देण्याची भूमिका घेणाऱ्या कार्यकर्त्यांच्यासाठी रिपब्लिकन सेना हे विचारपीठ आहे. यामध्ये कुठल्याही गटातटाचे राजकारण नसून समाज बांधवांच्या कल्याणाचा निर्णय घेतला जाणार आहे. ज्या समाजावर अन्याय होईल त्या समाजाची बाजू सक्षमपणाने सरकारची दरबारी मांडण्यासाठी वेळ पडल्यावर रस्त्यावर आंदोलन करण्याची तयारी असणाऱ्या कार्यकर्त्यांना यापुढे संधी देण्यात येणार आहे.
सातारा शहरातील राधिका रोडवरील शिवप्रताप बिल्डिंग, दीक्षित हार्ड केअर हॉस्पिटलच्या शेजारी, रिपब्लिकन सेना शहर कार्यालयामध्ये या निवडी होणार आहेत. या निवडीच्या साठी अनेक कार्यकर्त्यांनी आपला अहवाल सादर केलेला आहे. इतर कार्यकर्त्यांनी यापूर्वी फुले शाहू आंबेडकर चळवळी केलेल्या कार्याच्या अहवाल सादर करावा. रिपब्लिकन सेना हा पक्ष आपला असून आपल्यालाच पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावे लागतील. असे सूचित केले आहे. इतर पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांसाठी हे पुनर्वसन केंद्र नसून सच्चा विचारलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले जाईल असे स्पष्ट केले आहे. फक्त लेटर पॅड व विजिटिंग कार्ड आणि वाहनावर स्टिकर लावण्यासाठी कृपया कोणी रिपब्लिकन सेनेमध्ये येऊ नये. अशी नम्र विनंती केली आहे. त्याच्या सर्वच राजकीय पक्षांनी स्वागत केले आहे.


फोटो— रिपब्लिकन सेना निवडीची माहिती पत्रकार परिषदेत देताना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री रमेश उबाळे व जिल्हाध्यक्ष नितीन रोकडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *