इरफान ने देवदूताची भूमिका बजावली,त्याची शौर्य पदकासाठी शिफारस व्हावी.

इरफान ने देवदूताची भूमिका बजावली,
त्याची शौर्य पदकासाठी शिफारस व्हावी.


म्हसवड..प्रतिनिधी
तांदूळवाडी तालुका माळशिरस येथे टमटम वाहन विहिरीत पडले असता स्वतःचा जीव धोक्यात घालून विहिरीत पडलेल्या बालक व व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढल्याबद्दल इरफान मुजावर राहणार तांदूळवाडी यांनी देवदूताची भूमिका बजावली असून महाराष्ट्र शासनाने त्याची शौर्यपदकासाठी केंद्राकडे शिफारस करावी अशी मागणी क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी केली आहे
अपघात ग्रस्त वाहनातून विहिरीत पडलेल्या व्यक्तींना स्वतःचा जीव धोक्यात घालून मोठ्या जिद्दीने जीवदान दिल्याबद्दल इरफान मुजावर राहणार तांदुळवाडी यांचा सत्कार क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे आयोजित केला होता. संस्थाध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर यांचे हस्ते इरफान मुजावर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य विठ्ठल लवटे, मुजम्मिल तांबोळी, क्रांतिवीर कॉलेजमधील शिक्षक,पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
पंढरपूर तालुक्यातील कुटुंबीय देवदर्शनासाठी म्हसवड येथे आले होते. म्हसवड येथून परत जाताना तांदूळवाडी नजीक वाहन रस्त्याकडे च्या विहिरीत पडले. त्यात एकूण 16 व्यक्ती होत्या. घटनास्थळाच्या जवळच इरफान मुजावर असल्याने त्याने क्षणाचाही विलंब न लावता प्रथम गावकऱ्यांना मोबाईल वरून खबर दिली व त्यांना बोलवून घेतले व दरम्यानच्या कालावधीत स्वतः विहिरीत उडी टाकून बालकासह तीन व्यक्तीचे प्राण वाचवले. इरफान याने दाखवलेल्या धाडसाबद्दल त्याचा सत्कार क्रांतिवीर संकुलात करण्यात आला.
यावेळी बोलताना कृषिरत्न विश्वंभर बाबर म्हणाले अपघातातून विहिरीत पडलेल्या वाहनातील लोकांचे जीव वाचवताना इरफान मुजावर यांनी देवदूताची भूमिका बजावली आहे. त्याचे धाडस, तत्परता आणि शौर्य महत्त्वाचे आहे. काळजाचा ठोका चुकवणारी घटना मात्र यावेळी इरफानने धाडस दाखवल्यामुळे तीन लोकांचे प्राण वाचले. विशेषता लहान बालकांसाठी इरफान देवदूत ठरला आहे. इरफानच्या धाडस व शौर्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने शौर्य पथकासाठी त्याची शिफारस केंद्र शासनाकडे करावी अशी मागणी विश्वंभर बाबर यांनी केली आहे.
यावेळी इरफान यांनीही घडलेली घटना व त्याबाबत त्यांनी केलेल्या तातडीच्या कार्यवाहीची माहिती उपस्थितांना दिली. जीवनात माझ्या हातून एक चांगले कार्य झाले असून त्याबद्दल मला धन्यता वाटत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्राध्यापक विश्वंभर बाबर व क्रांतिवीर कॉलेजने दूरदृष्टीतून माझा सन्मान केल्याबद्दल इरफान मुजावर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार प्राचार्य विठ्ठल लवटे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

...
ताज्या बातम्या:
जेष्ठ किर्तनकार कै.आनंदराव लेंभे (शास्त्रीनाना)यांचे द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त शुक्रवारी पिंपोडे बुद्रुक येथे भजन स्पर्धा    |    कृतज्ञता सोहळ्यात शिंदे परिवाराकडून विद्यार्थ्यांना भेटवस्तूचे वाटप…    |    साताऱ्यात सकल मातंग समाजाचा उपवर्गीकरणासाठी मोर्चा.    |    मायणी येथे नवागतांचे अभूतपूर्व स्वागत    |    खानापुर येथील संत निरंकारी मंडळाच्या रक्तदान शिबिरासउत्स्फूर्त प्रतिसाद; १२७ रक्तदात्यांचा सहभाग    |    माणगंगा शैक्षणिक संकुलात नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 चा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा    |    रिपब्लिकन सेनेच्या सातारा जिल्हा पदाधिकारी दि: २१ जून रोजी निवडी..    |    इरफान ने देवदूताची भूमिका बजावली,त्याची शौर्य पदकासाठी शिफारस व्हावी.    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!