खानापुर येथील संत निरंकारी मंडळाच्या रक्तदान शिबिरासउत्स्फूर्त प्रतिसाद; १२७ रक्तदात्यांचा सहभाग

खानापूर प्रतिनिधी

16जुन 2026: संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन (रजि.), दिल्ली यांच्या वतीने खानापूर शाखेअंतर्गत संत निरंकारी सत्संग भवन, खानापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल १२७ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून समाजसेवेचा आदर्श घालून दिला.

शिबिराचे उद्घाटन आमदार श्री सुहास भैय्या बाबर यांच्या हस्ते तसेच खानापूर पंचायत समितीचे उपसभापती श्री सुहास शिंदे, जिल्हा परिषद सदस्या अँड सही शिंदे, पंचायत समितीचे सदस्य पांडुरंग खोत, यांचे उपस्थितीत संपन्न झाले यावेळी बोलताना त्यांनी संत निरंकारी मंडळाचे सामाजिक व मानवतावादी कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. मंडळाची विचारधारा प्रत्येक मानवाला एकत्र आणणारी असून आजच्या समाजाला अशा शिकवणीची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच रक्तदान शिबिराच्या आयोजनाबद्दल मंडळास शुभेच्छा दिल्या.खानापुर पंचायत समितीचे उपसभापती सुहास शिंदे यांनी स्वतः रक्तदान करुन समाजाप्रती आदर्श निर्माण करुन दिला.

शिबिराच्या प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करताना खानापूर संयोजक श्री दत्तात्रय जगताप यांनी सांगितले की, सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या कृपाशीर्वादाने हे मानवकल्याणाचे कार्य सुरू आहे. “मानवाला मानव प्रिय असावा, एकमेकांचा आधार बनावा” या तत्कालीन सदगुरु बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या शिकवणीनुसार संत निरंकारी मिशन विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. आज मानवाने विज्ञानाच्या माध्यमातून अनेक शोध लावले असले तरी रक्ताचा पर्याय अद्याप निर्माण करता आलेला नाही. त्यामुळे रक्तदान ही काळाची गरज असून प्रत्येक सक्षम व्यक्तीने रक्तदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. रक्तदान शिबीर दरम्यान डॉ.वैशाली हजारे, डॉ.अप्पासाहेब पाटील, मा.हरिश्चंद्र माने (गटविकास अधिकारी) ,मा.रोहित नायकुडी (मॅनेजर-एसबीआय बँक, विटा) मा.जे पी. टिंगरे, मा.सुधीर पवार – अध्यक्ष सराफ असोसिएशन खानापूर, मा. आनंदराव स्वामी-नगरसेवक खानापूर ,मा.दादा भगत – शिवसेना तालुका अध्यक्ष, जे पी टिंगरे, स्वप्निल मंडले सर,ज्ञानेश्वर बाबर -माजी उपनगराध्यक्ष, मा.सज्जन बाबर- सरपंच बानुरगड यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. रक्तसंकलनाचे कार्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय, मिरज व पद्मभूषण वसंत दादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. रक्तदान शिबिरामध्ये खानापूर परिसरातील संत-महापुरुष, माता-भगिनी तसेच युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे नियोजन सातारा झोनचे झोनल इन्चार्ज श्री नंदकुमार झांबरे यांचे मार्गदर्शनानुसार, खानापूर संयोजक श्री दत्तात्रय जगताप व सेवादल आणि स्वयंसेवकांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

...
ताज्या बातम्या:
जेष्ठ किर्तनकार कै.आनंदराव लेंभे (शास्त्रीनाना)यांचे द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त शुक्रवारी पिंपोडे बुद्रुक येथे भजन स्पर्धा    |    कृतज्ञता सोहळ्यात शिंदे परिवाराकडून विद्यार्थ्यांना भेटवस्तूचे वाटप…    |    साताऱ्यात सकल मातंग समाजाचा उपवर्गीकरणासाठी मोर्चा.    |    मायणी येथे नवागतांचे अभूतपूर्व स्वागत    |    खानापुर येथील संत निरंकारी मंडळाच्या रक्तदान शिबिरासउत्स्फूर्त प्रतिसाद; १२७ रक्तदात्यांचा सहभाग    |    माणगंगा शैक्षणिक संकुलात नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 चा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा    |    रिपब्लिकन सेनेच्या सातारा जिल्हा पदाधिकारी दि: २१ जून रोजी निवडी..    |    इरफान ने देवदूताची भूमिका बजावली,त्याची शौर्य पदकासाठी शिफारस व्हावी.    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!