हिंदूसूर्य महाराणा प्रताप जयंती निमित्त साताऱ्यात कार्यक्रम

(अजित जगताप)

सातारा दि: वीर शिरोमणी महाराणा प्रताप महाराज यांच्या ४८६ व्या जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यात हिंदूसूर्य महाराणा प्रताप जयंतीचे विविध कार्यक्रम होत आहेत. श्री महाराणा प्रताप उत्सव समितीच्या वतीने महाराणा प्रताप चौक, बसपा पेठ ,राधिका रोड सातारा या ठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमाला छत्रपती शिवरायांचे थेट वंशज व सातारा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष अँड .डी.जी बनकर, मुख्याधिकारी विनोद जळक व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हिंदू सूर्य महाराणा प्रताप जयंती समारोह होत आहे. तसेच अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. सातारा जिल्ह्यातील रजपूत बांधव यांनी विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. महाराणा प्रताप यांच्या कार्याची महंती जगभर पसरलेली आहे. जावली तालुक्यात मेढा , सायगाव व विविध ठिकाणी दत्ता पवार मेढेकर, रमेश पवार, उमेश पवार , सुरेश पवार, वडूज या ठिकाणी सुरज पवार, निलेश पवार यांच्यासह अनेक बांधव कार्यक्रमाचे नियोजन करत आहेत. रिपब्लिकन सेनेच्या वतीने महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहात साजरी करणार असल्याची माहिती पब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश अनिल उबाळे, नितीन रोकडे , अशोक भिसे यांनी दिली आहे.
बुधवार दिनांक १७ जून रोजी सातारा शहरात सकाळी बसपा पेठेतील महाराणा प्रताप चौकात श्री महाराणा प्रताप महाराज यांच्या मूर्तीचे पूजन आणि दुपारी रक्तदान शिबिर तसेच सायंकाळी सात वाजता जाहीर अभिवादन कार्यक्रम आणि बक्षीस समारंभ होणार आहे. त्यानंतर साडेआठ वाजता सर्वांसाठी स्नेह भोजनाचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमासाठी रजपूत समाज सेवा संघ ,सातारा अध्यक्ष वीरसिंग परदेशी ,शैलेंद्र परदेशी, राजेंद्र परदेशी, अनिल परदेशी, महेंद्र राजपूत, मुकुंद सिंह परदेशी, ओमकार परदेशी, नितीन परदेशी, अमर परदेशी यांच्यासह रजपूत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. बुधवार दिनांक १७ जून रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झाली असून कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
……………………………………………
फोटो- महाराणा प्रताप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

...
ताज्या बातम्या:
जेष्ठ किर्तनकार कै.आनंदराव लेंभे (शास्त्रीनाना)यांचे द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त शुक्रवारी पिंपोडे बुद्रुक येथे भजन स्पर्धा    |    कृतज्ञता सोहळ्यात शिंदे परिवाराकडून विद्यार्थ्यांना भेटवस्तूचे वाटप…    |    साताऱ्यात सकल मातंग समाजाचा उपवर्गीकरणासाठी मोर्चा.    |    मायणी येथे नवागतांचे अभूतपूर्व स्वागत    |    खानापुर येथील संत निरंकारी मंडळाच्या रक्तदान शिबिरासउत्स्फूर्त प्रतिसाद; १२७ रक्तदात्यांचा सहभाग    |    माणगंगा शैक्षणिक संकुलात नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 चा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा    |    रिपब्लिकन सेनेच्या सातारा जिल्हा पदाधिकारी दि: २१ जून रोजी निवडी..    |    इरफान ने देवदूताची भूमिका बजावली,त्याची शौर्य पदकासाठी शिफारस व्हावी.    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!