विरहाचा पीळ सुटला; ‘पैरेदारांचा’ भावनिक मेळावा ठरला गावच्या संस्कृतीचा जिवंत उत्सव

श्री. संदिपान (आबा) शंकर शिर्के यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठांच्या डोळ्यांत दाटल्या आनंदाश्रूंच्या धारा.

गावाकडची माती, नाती आणि जिव्हाळा यांना आजच्या धावपळीच्या युगात जणू विस्मृतीची किनार लाभत चालली आहे. आधुनिकतेच्या वेगात हरवू लागलेली माणुसकी आणि गावपण पुन्हा एकदा जिवंत करण्याचे अविस्मरणीय कार्य ‘जय हो… डाळिंब बागायतदार ग्रुप’च्या माध्यमातून घडले. समूहाचे आदर्शवादी व्यक्तिमत्त्व श्री. संदिपान (आबा) शंकर शिर्के यांच्या संवेदनशील संकल्पनेतून गावातील आणि पंचक्रोशीतील वाडी-वस्तीवर राहणाऱ्या ७० ते ८० वर्षे वयोगटातील ज्येष्ठ ‘पैरेदारांचे’ अभूतपूर्व स्नेहसंमेलन अत्यंत भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

हा कार्यक्रम केवळ एक मेळावा नव्हता, तर तो गावच्या संस्कृतीचा, जुन्या नात्यांचा आणि हरवलेल्या आपुलकीचा जणू पुनर्जन्मच होता. अनेक दशकांपूर्वी गावोगावी ‘पैरा’ संस्कृतीतून शेती फुलायची. कुणाचा नांगर, कुणाची बैलजोडी, तर कुणाची राबणारी मेहनत… एकमेकांच्या साथीने शेतीची कामे पार पडायची. माणूसपणाच्या या श्रीमंतीवरच गावांचा संसार उभा होता.

काळाच्या ओघात हीच माणसे वयोवृद्ध झाली. शरीर थकले, चालणे कमी झाले आणि आयुष्याच्या उत्तरार्धात अनेक जण आपल्या जुन्या सवंगड्यांपासून दूर गेले. मनात भेटीची ओढ होती, पण परिस्थितीमुळे भेट अशक्य झाली होती. याच न बोललेल्या भावनांना ओळखून श्री. संदिपान (आबा) यांनी हा आगळावेगळा उपक्रम राबवला आणि जुन्या ‘पैरेदारांना’ पुन्हा एकत्र आणत विरहाचा पीळ कायमचा सोडवला.

डोळ्यांत अश्रू, ओठांवर हसू आणि गळाभेटीतून उमटले जिव्हाळ्याचे सूर

वर्षानुवर्षांनी जेव्हा हे जुने साथीदार एकमेकांसमोर आले, तेव्हा परिसरातील वातावरण अक्षरशः भावनांनी भारावून गेले. थरथरणारे हात, डोळ्यांत दाटलेले अश्रू आणि गळाभेटीतून उमटणारा जीवाभावाचा स्पर्श पाहून उपस्थितांच्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या.

“बाबा रं… कसा हाईस रं… आता वाटत नव्हतं पुन्हा भेट होईल…” असे शब्द अनेकांच्या तोंडून नकळत बाहेर पडत होते. अनेक वर्षांचा विरह, आयुष्यभराच्या आठवणी आणि एकमेकांवरील निखळ प्रेम या क्षणी जणू एका भावनिक महासागरात मिसळून गेले होते. उपस्थितांनी अनुभवलेला हा प्रसंग खऱ्या अर्थाने ‘न भूतो न भविष्यती’ असाच ठरला.

पारंपरिक फेट्यांतून मानाचा सन्मान

या अनोख्या स्नेहमेळाव्यात सर्व ज्येष्ठांचा पारंपरिक फेटा बांधून गौरव करण्यात आला. सन्मानाचा फेटा डोक्यावर चढताच वृद्धांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद, अभिमान आणि समाधान प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून गेला. आयुष्यभर गावासाठी राबलेल्या या जाणत्या पिढीला दिलेला हा मान गावच्या संस्कृतीचा खरा सन्मान ठरला.

कार्यक्रमानंतर सर्वांसाठी खास गावरान पद्धतीचे झणझणीत मटन आणि भाकरीचे स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. सर्व ज्येष्ठ पैरेदार एकत्र बसून जेवताना जुन्या आठवणींना उजाळा देत होते. शेतीच्या गोष्टी, बैलगाड्यांचे दिवस, पावसाळ्यातील कष्ट, गावातील उत्सव आणि जुन्या आठवणींच्या गप्पांनी वातावरण पुन्हा एकदा जिवंत झाले.

आबा शिर्के.

‘आबा’ यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक

आजच्या काळात केवळ स्वतःपुरते विचार करणाऱ्या समाजात, वृद्धांच्या मनातील न बोललेली वेदना समजून त्यांना त्यांच्या जिवाभावाच्या माणसांशी पुन्हा भेटवून देण्याचे अतिशय मोलाचे कार्य श्री. संदिपान (आबा) शंकर शिर्के आणि ‘जय हो… डाळिंब बागायतदार ग्रुप’ने केले आहे. हा उपक्रम केवळ कार्यक्रम न राहता, सामाजिक बांधिलकी, माणुसकी आणि संस्कृती जपणारा प्रेरणादायी आदर्श ठरला आहे.

या अनोख्या आणि हृदयस्पर्शी उपक्रमाबद्दल संपूर्ण परिसरातून श्री. संदिपान (आबा) शंकर शिर्के व त्यांच्या सहकाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत असून, “गाव अजूनही जिवंत आहे, कारण गावात अजूनही अशी माणसं आहेत,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.

‘झणझणीत मटन-भाकरी’सोबत रंगल्या जुन्या आठवणी

गावाकडची माती, नाती आणि जिव्हाळा यांना आजच्या धावपळीच्या युगात जणू विस्मृतीची किनार लाभत चालली आहे. आधुनिकतेच्या वेगात हरवू लागलेली माणुसकी आणि गावपण पुन्हा एकदा जिवंत करण्याचे अविस्मरणीय कार्य ‘जय हो… डाळिंब बागायतदार ग्रुप’च्या माध्यमातून घडले. समूहाचे आदर्शवादी व्यक्तिमत्त्व श्री. संदिपान (आबा) शंकर शिर्के यांच्या संवेदनशील संकल्पनेतून गावातील आणि पंचक्रोशीतील वाडी-वस्तीवर राहणाऱ्या ७० ते ८० वर्षे वयोगटातील ज्येष्ठ ‘पैरेदारांचे’ अभूतपूर्व स्नेहसंमेलन अत्यंत भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

हा कार्यक्रम केवळ एक मेळावा नव्हता, तर तो गावच्या संस्कृतीचा, जुन्या नात्यांचा आणि हरवलेल्या आपुलकीचा जणू पुनर्जन्मच होता. अनेक दशकांपूर्वी गावोगावी ‘पैरा’ संस्कृतीतून शेती फुलायची. कुणाचा नांगर, कुणाची बैलजोडी, तर कुणाची राबणारी मेहनत… एकमेकांच्या साथीने शेतीची कामे पार पडायची. माणूसपणाच्या या श्रीमंतीवरच गावांचा संसार उभा होता.

काळाच्या ओघात हीच माणसे वयोवृद्ध झाली. शरीर थकले, चालणे कमी झाले आणि आयुष्याच्या उत्तरार्धात अनेक जण आपल्या जुन्या सवंगड्यांपासून दूर गेले. मनात भेटीची ओढ होती, पण परिस्थितीमुळे भेट अशक्य झाली होती. याच न बोललेल्या भावनांना ओळखून श्री. संदिपान (आबा) यांनी हा आगळावेगळा उपक्रम राबवला आणि जुन्या ‘पैरेदारांना’ पुन्हा एकत्र आणत विरहाचा पीळ कायमचा सोडवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!