आटपाडी : तालुक्यातील ज्येष्ठ रावसाहेब काका पाटील यांनी मराठी भाषेतील शिक्षण बंद करण्याबाबत सर्वच राजकीय पक्षांचे एकमत असल्याचे मत व्यक्त करत ही गोष्ट अभिजीत मराठी भाषेच्या दृष्टीने महाराष्ट्राचे दुर्दैव आहे असे स्पष्ट केले आजचौ महाराष्ट्राची अवस्था एबीपी माझाचे राष्ट्रीय संपादक राजीव खांडेकर साहेब यांच्या भाषेत बोलायचे झाले तर महाराष्ट्राची अवस्था बिहार सारखी किंबहुना त्याच्या पलीकडची वाईट अवस्था निर्माण केली आहे राज्यकर्त्यांना विरोधी पक्षांना याचे काही सोयर सुतक पडली नाही 6000 कोटीच्या प्रोजेक्टची किंमत 9000 कोटी करून 3000 कोटी रुपये खाणाऱ्या राज्य सरकारला काहीच वाटत नाही पण महाराष्ट्रातील गोरगरीब घरातील संस्थाचालक पुढे येऊन आपल्या गावासाठी शिक्षण संस्था स्थापन करून शिक्षण देत असणाऱ्या संस्थाचालकाला चोर सामन्यात हे भारतीय जनता पक्षाचे सरकार धन्यता मानत आहे ही गोष्ट महाराष्ट्र राज्याच्या विकासाच्या दृष्टीने राज्याला हानिकारक आहे हे सांगायला भविष्य व्यक्तीची गरज नाही जे सरकार शिक्षणाच्या दृष्टीने सुधारणा करण्याच्या ऐवजी संस्थाचालकावर नोकर नेमणुकीच्या बाबतीत कसे कशी त्यांच्यावर बंधन घालता येतील हे पाहत आहे खरे तर संस्थांचालक आपल्या परिसरातील बेरोजगारांना त्यांची आर्थिक परिस्थिती पाहून नोकरी देत असतात असे शिक्षक चांगले शिकवतात की नाही हे पाहण्याऐवजी त्यांच्या नेमणुकीवर बदलणे घालून परिसरातील बेरोजगारांना रोजगारापासून वंचित ठेवण्यासाठी नेमणुकी वर निर्बंध लादणे हे कोणाच्याच फायदेशीर नाही. राज्य सरकारला जर शिक्षण संस्था चालकाला चोर ठरवायचे असेल तर प्रथम आपल्या राज्यात पेपर फुटीचे किती कोटी रुपये कोणी कोणी लाटले याचा हिशोब द्यावा याच्या पाठीमागे बढे राज्यकर्ते असल्याशिवाय अशी गोष्ट घडली शक्य नाहीभारतीय जनता पक्षाला सर्वसामान्यांची मुलं नोकरीला लागली पाहिजे अशी मुळीच वाटत नाही फक्त बुद्धिमत्ता असून चालत नाही बुद्धीत साठवलेली विचार देण्याची कला आवश्यक आहे शिक्षण क्षेत्राकडे या गोष्टीकडे भारतीय जनता पक्षाचे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे कारण याला गरीब घरातली मुले शिकू द्यायची नाही संस्थाचालकांचा छळ करून त्यांना संस्था बंद पाडायचे आहेत अन्यथा आम्ही संस्था चालक या मतावर आलो आहे तुमच्या शाळा तुम्हीच चालवा आमच्या जागा मोकळ्या करून द्या अशी भावना रावसाहेब काका पाटील यांनी व्यक्त केली Post navigation अनोखे स्नेह संमेलन , पैरेदारांचा’ भावनिक मेळावा ठरला गावच्या संस्कृतीचा जिवंत उत्सव लोकशाही व प्रशासकीय सुधारणा तात्काळ करण्याबाबतची मागणी ॲड. कांचन धौडीराम खरात यांनी केली.