सातारा – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १४३वी जयंती अखिल भारत हिंदुमहासभा व स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंच, सातारा यांच्या वतीने गुरुवार, दिनांक २८ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सुपनेकर सभागृह, सातारा येथे साजरी करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी सातारा नगरपरिषद नगराध्यक्ष तथा गोडबोले ट्रस्टचे अध्यक्ष मा. अच्युतराव गोडबोले उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्ता सणस, प्रदेशाध्यक्ष, हिंदुमहासभा असणार आहेत. हिंदुमहासभा प्रवक्ते आनंदजी कुलकर्णी यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या रत्नागिरी पर्वावर विशेष भाषण होणार आहे तसेच मा. दुष्यंतराव जगदाळे, अध्यक्ष, सावरकर विचार मंच उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास सावरकर भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष धनराज जगताप, उमेश गांधी, विलास पाटील, सुनील मोरे, ललित ओसवाल, रमेश ओसवाल, अ‍ॅड. सतीशराव खानविलकर, सुनील घोलप, महादेव कुलकर्णी, सचिन पंडित आदी प्रयत्नशील आहेत.

या वेळी सहकार, विधी, उद्योग, कला, क्रीडा आणि राजकारण क्षेत्रातील विविध मान्यवरांचा सत्कारही करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *