आटपाडी दि . २६ ( प्रतिनिधी )
दैनिक सकाळ, दैनिक लोकसत्ताचे माजी बातमीदार, २५ वर्षे पत्रकारीतेत खास ठसा उमटविणारे शांत, संयमी, निगर्वी, कष्टाळू व्यक्तीमत्व चैतन्य यशवंत पैठणकर ( वय ६४ ) यांचे पुणे येथे दुःखद निधन झाले .
गेले काही दिवस त्यांचेवर उपचार सुरू होते . आज रात्री ८ वाजणेच्या दरम्यान चैतन्य पैठणकर यांची प्राणज्योत मालवली .
१९८५ च्या दरम्यान सकाळ कोल्हापूर मधून बातमीदारीस सुरुवात केलेल्या चैतन्य पैठणकर यांनी सलग २५ वर्षे पत्रकारीतेत मोलाची कामगिरी बजावली .
आटपाडी तालुक्याच्या चौफेर व सर्वांगीण परिवर्तनात शेकडो प्रश्नांवर निस्वार्थ भावनेने खारीचे योगदान देणाऱ्या चैतन्य पैठणकर यांच्या पत्रकारितेने नेहमीच आग्रही, सजग राहण्यात मोठी भूमिका बजावली होती .
आटपाडी तालुक्याच्या सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच आणि विशेषत : सांगली जिल्हा स्तरावरील अनेक नेतेमंडळी चैतन्य पैठणकर यांचा आपुलकी, श्रद्धा, आत्मीयता आणि सदभावना, सन्मानाने मोठा आदर करीत .
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वतःला सदैव स्वयंसेवक म्हणून घेणाऱ्या चैतन्य पैठणकर यांनी सर्वच जाती, जमाती धर्मातील असंख्य लोकांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते .
विविध धार्मिक कार्यात पौराहित्य करण्याचे काम ही चैतन्य पैठणकर यांनी अनेक दशके केले .
अत्यंत गरीबीत जीवन जगलेल्या चैतन्य पैठणकर यांनी सदैव हसतमुख स्वभावाद्वारे आपल्या जीवनाला नवा आयाम दिला . वीस वर्षापूर्वी पत्नी, काही वर्षापूर्वी भाऊ, बहीन गमावलेल्या चैतन्य पैठणकर यांनी या प्रचंड दुःखावर मात करीत त्यांचे सुपुत्र ओंकार यांना परिपूर्ण घडविण्यात प्रचंड यातायात केली होती .
मुलगा, सून, नात, बहिणी, इतर नातलग असा स्वपरिवार आणि मोठा मित्र परिवार मागे असणाऱ्या चैतन्य पैठणकर यांच्या जाण्याने आपल्याला अतिव दुःख झाल्याच्या आणि एक सच्चा, दिलदार, माणुसकी सर्वश्रेष्ठ मानणारा दोस्त, ज्येष्ठ बंधु आपण गमावल्याच्या भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष, तथा ज्येष्ठ पत्रकार सादिक खाटीक यांनी व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली .
पुणे येथेच चैतन्य पैठणकर यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगीतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!