माणच्या मातीतील सत्कार भविष्यात ऊर्जा देईल –नगरसेविका कु. आकांक्षा शंकरभाई विरकर यांचे भावनिक उदगारनुकताच अहिंसा पतसंस्थेत मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका कु. आकांक्षा शंकरभाई विरकर यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष नितिनभाई दोशी यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी सत्कारास उत्तर देताना कु. आकांक्षा विरकर या अतिशय भावुक झाल्या. त्यांना अश्रू अनावर झाले. त्या म्हणाल्या माणच्या मातीतील आपल्या सगळ्या जवळच्या माणसांनी इतक्या प्रेमाने माझा सत्कार केला. हा सत्कार माझ्या राजकीय, सामाजिक कार्य करण्यास निश्चितच ऊर्जा देईल. मी मीरा भाईंदर महापालिकेत भाजपचे आमदार नरेंद्रभाई मेहता यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका म्हणून निवडून आले. मीरा भाईंदर येथील एका कार्यक्रमात राज्याचे ग्रामविकास मंत्री व आपले नेते मा. ना. जयकुमार गोरे भाऊ यांनीही आनंद व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.मी मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात काम करत असले तरी नागोबा फाउंडेशनच्या माध्यमातून माझे वडील व मी माणदेशातील सार्वजनिक कामात नेहमीच उपक्रम राबवित असतो.या कार्यक्रमाचे वेळी प्रमुख मान्यवर मीरा भाईंदर चे भाजपा उपाध्यक्ष शंकर भाई विरकर, कु. अपेक्षा विरकर, लुनेश विरकर सर, जेष्ठ पत्रकार आण्णासाहेब टाकणे, श्रावण पडळकर उपस्थित होते.प्रथमतः मीरा भाईंदर महापालिकेच्या नगरसेविका कु. विरकर व मान्यवर यांना श्री सिद्धनाथ मंदिरापासून वाजत गाजत संस्थेच्या कार्यालयात आणण्यात आले. कु. आकांक्षा विरकर यांचा सत्कार शाल व भेटवस्तू देऊन माजी नगराध्यक्ष नितिन भाई दोशी यांचे हस्ते करण्यात आला.यावेळी जेष्ठ पत्रकार आण्णासाहेब टाकणे, श्रावण पडळकर, लुनेश विरकर सर, नितिनभाई दोशी, नागोबा फाउंडेशन चे अध्यक्ष शंकरभाई विरकर आदी मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे लिपिक अक्षय धट यांनी केले. म्हसवड शहरातुन नगरसेवक आकांक्षा वीरकर यांची भव्य मिरवणूक…. Post navigation अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद-कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके महाबळेश्वर येथे खाजगी फलकाच्या तक्रारीनंतर फक्त फलक काढण्याची कारवाई..