पंढरपूर वृत्तसेवापंढरपूर आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या लिंगायत समाजाची बैठक आज रविवार दिनांक 24 मे रोजी पंढरी नगरीत पार पडलीयावेळी बोलताना हिंदू वीरशैव लिंगायत मंचचे प्रांत अध्यक्ष दानेश जी तिमशेट्टी यांनी सर्व हिंदू लिंगायत बांधवाणी जण गणना करतेवेळी धर्माच्या रकान्यात हिंदू आणि जातीच्या रकान्यात लिंगायत वाणी/तेली/गवळी/,कोष्टी/माळी/कुंभार/ अशी तुमची जी जात असेल ती टाकावी ,मात्र त्यापूर्वी हिंदू लिंगायत हे वाक्य आवर्जून लावले पाहिजे असे प्रतिपादन केलेसध्या तुमची घर गणना सुरू आहे,यावेळी आपणास SC/ST अथवा Other ( इतर ) असा पर्याय विचारला जातो,अश्यावेळी तुम्ही इतर हा पर्याय निवडावा असे हीसांगितलेत्यांनी सध्या हिंदुधर्मात फूट पाडण्यासाठी विदेशी फंडिंग मोठ्या प्रमाणात होत असून ,हिंदुनी त्यास बळी पडू नये असे आवाहन केलेमहाराष्ट्र,कर्नाटक,आंध्र प्रदेश या राज्यात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावर असल्याने यांच्या मध्ये कशी फूट पाडता येईलयाकरिता टूल किट सक्रिय झाले असून ,लिंगायत समाजाने यास बळी पडू नये असे मत प्रांत कार्यकारणीचे मार्गदर्शक हेमंत हरहरे यांनी व्यक्त केलेलिंगायत समाजालासध्या गाफील राहून चालणार नाही,सर्व लिंगायत बांधवांनी सक्रिय राहून समाज संघटित केला पाहिजे असे आवाहन प्रांत संयोजक प्राचार्य गजानन धरणे सर यांनी केलेआजच्या बैठकीत जिल्हा सह संयोजक रामेश्वर कोरे यांच्या उपस्थितीत पंढरपूर तालुका आणि मंगळवेढा तालुक्यासाठी काही निवडी करण्यात आल्यायामध्ये हिंदू वीरशैव लिंगायत मंच च्या पंढरपूर तालुका मार्गदर्शक पदी ऐनापुरे आणि बँक ऑफ बडोदा चे सेवानिवृत अधिकारी आण्णाराया कोरे ,सुभाष खटावकर यांच्या निवडी करण्यात आल्या,तर पंढरपूर तालुका संयोजक पदी सिद्धेश्वर कोरे सर यांची निवड करण्यात आली,तालुकासहसंयोजक पदी चंद्रकांत स्वामी बिरगीकर,आणि नागेश कुंभार यांच्या निवडी करण्यात आल्या,तसेचसोशल मीडिया प्रमुख पदी पत्रकार प्रकाश सरताळे आणि फिजिओथेरपिस्ट राजू म्हमाणे यांची निवड करण्यात आलीतर मंगळवेढा तालुका संयोजक पदी विनायक कोरे यांची निवड करण्यात आलीअत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सर्व निवडीपार पडल्या असून यानंतर समाज एकत्रीकरण,जनजागृती आणि प्रचार प्रसिद्धीवर भर देण्यात येणार असून,जिल्ह्यात कार्य वाढविण्यासाठी हिंदू वीरशैव लिंगायत समाज जिल्हा सहसंयोजकरामेश्वर कोरे यांना सर्वाधिकार दिला असल्याचे शेवटी प्राचार्य गजानन धरणे सर यांनी सांगितलेयावेळी लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते*…. Post navigation ढोले भगिनींचा अहिंसा पतसंस्थेच्या वतीने सत्कार. विलास खरात यांच्या ‘गावगाडा’ पुस्तकाचा कानडीत अनुवाद;