कु. स्वरांजली ढोले व गायत्री ढोले यांचे बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश,

गटनेते व बांधकाम सभापती अकील भाई काझी यांचे हस्ते सत्कार

म्हसवड (वृत्तसेवा)

नुकत्याच झालेल्या 10वी व बारावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये घावघवीत यश संपादन केले बद्दल अहिंसा पतसंस्थेच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ आयोजित कारण्यात आला होता.

हा सत्कार म्हसवड नगरपरिषदेचे नगरसेवक, गटनेते व बांधकाम सभापती यांचे शुभ हस्ते पार पडले.

कु. स्वरांजली गजकुमार ढोले हिने इयत्ता 10 वी मध्ये 94.40% गुण प्राप्त करून तीने केंद्रात पहिला व विभागात दुसरा क्रमांक पटकवला. तर धनंजय गाडगीळ कॉलेज सातारा येथून 12 वी कॉमर्स मधून 94.17% गुण प्राप्त करून गायत्री शशिकांत ढोले हिने सातारा जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकवला आहे. त्यांचे यशाचे कौतुक व त्याना प्रोत्साहन पर हा कार्यक्रम आयोजित केला होता.

तसेच म्हसवड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये घवघवीत यश संपादन केले बद्दल व पक्षाचे गटनेते आणि बांधकाम सभापती पदी निवड झालेबद्दल अहिंसा परिवारावाकडून सत्कार घेण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना जेष्ठ पत्रकात अण्णासाहेब टाकणे म्हणाले कि,

सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन प्रत्येक मुलीने शिकल पाहिजे पुढ गेलं पाहिजे आणि खरंच स्वरांजली आणि गायत्री हा वारसा खऱ्या अर्थाने पुढ नेत आहेत. पहिलं प्रत्येक क्षेत्रात मुले पुढ असायची पण आता नक्कीच मुली सगळीकडे आघाडीवर आहे.आणि याच उदाहरणं म्हणजे स्वरांजली आणि गायत्री होत. ब अकील काझी म्हणजे कामाचा माणूस, त्यांचेकडे कोणत्याही पक्षाचा माणूस असूदेत त्यांचं काम होणारच अनेक गरजूची काम करणारा आणि 24 तास समाजासाठी उपलब्ध असणारा एकमेव नेता म्हणाव लागेल असे व्यक्तिमत्व. आपल्या मनोगतात बोलताना अहिंसा पतसंस्थेचे कुटुंब प्रमुख व म्हसवड नगरीचे माजी नगराध्यक्ष नितिन भाई दोशी म्हणाले कि, स्वरांजली ढोले व गायत्री ढोले या सावित्रीमाईंच्या लेकींनी हे जे यश संपादित केले आहे, हे नक्कीच अभिमानास्पद आहे. खऱ्या अर्थाने स्वरांजली ने तालुक्यात तर गायत्रीने जिल्ह्यात आपल्या ढोले कुटुंबाच नाव उज्वल केल आहे. दोघीना हि पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.

पुढे ते म्हणाले कि अकील काझी हे एकमेव नगरसेवक आहेत जे कोणालाच विरोध करत नाहीत. पण त्यांना विरोध करणारे खूप आहेत. परंतु या कोणालाही ण जुमनता आपले कार्य अखंडपणे अविरत चालू ठेवण्याचे काम अकील भाई नी केले. आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन मा. ना. जयकुमार गोरे भाऊ यांनी त्यांना गटनेते पदाची जबाबदारी दिली. गटनेता हि फार मोठी जबाबदारी असते. तसेच त्यांना बांधकाम सभापती पदाची मोठी जबाबदारी सुद्धा दिली आहे. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना अकील भाई काझी म्हणाले कि अहिंसा पतसंस्था हि नेहमीच होतकरू लोकांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत असते. आणि जे यशस्वी आहेत त्यांचे आदरतिथ्य करतात. याने इतरांनी प्रेरणा घेऊन अधिकचा अभ्यास करून यश संपादन करावे हा त्यामागचा उद्देश असतो. केलेला सत्कार व दिलेला मानपान याबद्दल त्यानी आभार मानले.

तसेच यश ढोले, सुरज ढोले, सत्कार मूर्ती स्वरांजली ढोले , गायत्री ढोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रम प्रसंगी गजकुमार ढोले, व कुटुंबीय, शशिकांत ढोले, चंद्रकांत कलढोणे, उमेश महामुनी, संस्थेचे संचालक बाळासाहेब सरतापे, धवल व्होरा, संस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितिन वाडेकर यांनी केले. तर आभार प्रशांत आहेरकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!