म्हसवड : फलटण एज्युकेशन सोसायटीच्यासिद्धनाथ हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, म्हसवड विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल यंदा ९२ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. निकाल जाहीर होताच विद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पालकांनीही समाधान व्यक्त केले. विद्यालयातून यंदा एकूण १२५ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी दोन विद्यार्थी गैरहजर राहिले, तर ११७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची मेहनत यांचा मोठा वाटा असल्याचे विद्यालय प्रशासनाने सांगितले. या परीक्षेत अक्षद किशोर वेदपाठक याने ९१ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. वैदेही सुनील पिसे हिने ८९ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर प्रथमेश प्रदीप काटकर याने ८७.२० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक संपादन केला. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवलागेला आहे.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच स्कूल कमिटीचे चेअरमन हेमंत रानडे, व्हा. चेअरमन श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने, सदस्य शिवराज राजेमाने, नितीन दोशी, संभाजी माने, विपुलशेठ दोशी यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यालयाचे प्राचार्य प्रवीण दासरे, उपप्राचार्य यादव पी. के. तसेच पर्यवेक्षक सतीश भोसले यांनी शिक्षकांच्या सहकार्यामुळे हे यश शक्य झाल्याचे सांगितले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. Post navigation प्रगतशील डाळिंब उत्पादक गणपत खाडे यांचे निधन. स्वराज्य रक्षणासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारा राजा छ. संभाजीराजे !