म्हसवड…. प्रतिनिधी
पळशी येथील प्रगतशील डाळिंब बागायतदार गणपत निवृत्ती खाडे यांचे वयाच्या 52 वर्षी नुकतेच दुःखद निधन झाले.
गणपत खाडे यांचा तरुण उद्योजक, बागायतदार, प्रगतशील शेतकरी म्हणून माण तालुक्यात नावलौकिक होता . नवीन तंत्रज्ञानाने युक्त व आधुनिक डाळिंब शेती यामध्ये गणपत खाडे यांचा हातखंडा होता. डाळिंब शेती व ठिबक सिंचन चे डिलर या माध्यमातून त्यांचा कृषी विभाग व शेतकऱ्यात मोठा जनसंपर्क होता. सायंकाळच्या वेळी म्हसवड मध्ये असतानाच अचानक अस्वस्थ वाटून चक्कर आल्याने त्यातच त्यांचे दुर्दैवी निधन झाले. क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर , संपादक विजय टाकणे पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी खाडे कुटुंबीयांचे सांत्वन केले. स्वर्गीय गणपत खाडे यांच्या पाठीमागे वृद्ध आई-वडील , भाऊ , पत्नी, यांच्यासह संकेत व किरण ही दोन मुले असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!