सातारा : छ. संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त येथील उद्यानातील छ. संभाजीराजे यांच्या शिल्पास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले.पालिकेतर्फे आजी-माजी पदाधिकारी,अधिकारी व कर्मचारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी टप्प्याटप्प्याने भेटी देऊन अभिवादन करण्यात आले.त्यामध्ये सम्यक ज्येष्ठ नागरिक संघाचे बी.एल.माने,डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत,डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे उपाध्यक्ष माणिक आढाव व ऍड.विलास वहागावकर,ज्येष्ठ सामाजिक नेते पी.टी.कांबळे (बापू), अरविंद साळुंखे,चंद्रकांत जाधव,स्वराज जाधव,बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर आदींचा समावेश होता.“औरंगजेबाच्या पदरी असणाऱ्या खाफीखानाने, “संभाजीराजा म्हणजे शिवाजीराजापेक्षा दसपट तापदायक राजा” म्हणून ज्यांचा उल्लेख केला आहे. असा महान राजा होते.शिवरायांनी स्थापन केलेल्या रयतेच्या स्वराज्यरक्षणसाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करणारा राजा होता.बालवयात स्वराज्यासाठी जो दिलेरखानाच्या गोटात ओलीस राहिला असा शिवरायांचा छावा.वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी जे औरंगजेबाच्या कराल दाढेत शिवछत्रपतींसोबत आग्र्याला गेले असे शूरवीर राजपुत्र.वयाच्या चौदाव्या वर्षी ‘बुधभूषण’ या संस्कृत ग्रंथांची ज्यांनी रचना केली होती.तसेच सातसतक,नाईकाभेद आणि नखशिख या ग्रंथाचे रचनाकार, पराक्रमी,निर्भीड,निर्व्यसनी,विद्वान,संस्कृत पंडित,चारित्र्यवान, प्रजाहितदक्ष राजा म्हणजे छत्रपती शंभुराजे.ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सतत नऊ वर्ष अनेक परकीय शत्रूसोबतच स्वकीय गद्दारांशीही अविरत संघर्ष केला.चाळीस दिवस मरणयातना सहन करूनही जो क्रूर व निर्दयी अशा औरंगजेबासमोर झुकला नाही. असा महापराक्रमी राजा.अत्यंत निर्व्यसनी असतानासुद्धा ज्यांच्या मृत्यूनंतरही कित्येक हरामखोरांनी त्यांना रगेल व रंगेल म्हणून बदनाम करण्यासाठी हयातभर आपल्या लेखण्या झिजवल्या.तरीसुद्धा ज्यांच्या पराक्रमाची छाप इथल्या समाजमनावर कायम राहिली. अशा स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचा,एका प्रतिभाशाली साहित्यिकाचा, प्रचंड विद्वान अशा संस्कृत पंडिताचा,महापराक्रमी,क्षात्रवीरस्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे होते.”असे विचार अभिवादनपर वक्ते प्रा.विक्रम कदम यांनी व्यक्त केले. फोटो : छ.संभाजीराजे यांच्या शिल्पास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना मान्यवर. Post navigation म्हसवड येथील सिध्दनाथ हायस्कूल चा निकाल 92 टक्के पंढरपूरची वाहतूक कोंडीतून सुटका मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या मागणीला यश