म्हसवड दि. ११
म्हसवड येथील प्रसिद्ध इलेक्ट्रिशन राकेश गजानन तिवाटणे यांचे दि.१० रोजी रात्री दुचाकीच्या धडकेने अपघाती निधन झाले.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी येथील माळशिरस चौकातुन ते आपल्या घरी म्हसवड येथे दुचाकीवरुन निघाले असताना पंढरपुर रोडवरुन सुसाट वेगाने आलेल्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली या अपघातात राकेश तिवाटणे हे गंभीररित्या जखमी झाले तर त्यांच्या पाठीमागे बसलेले शहाजी माने हे सुध्दा गंभीर जखमी झाले आहेत.
राकेश तिवाटणे हे स्वत: दुचाकी चालवत होते ते व शहाजी माने हे दोघेजण म्हसवड शहराच्या पाणी पुरवठा योजनेवर कामानिमीत्त गेले होते, तेथील काम आटोपुन ते रात्री आपल्या दुचाकीवरुन रात्री ८ च्या सुमारास घरी निघाले असताना त्यांची मोटारसायकल येथील माळशिरस चौकात आली असता पंढरपुर रस्त्यावरुन भरधाव वेगाने ट्रिपल सीट आलेल्या दुचाकी स्वाराने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली या धडकेने तिवाटणे यांचा एक पाय अक्षरशा जागेवरच तुटला त्यामुळे ते डांबरी रस्त्यावर पडले यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने ते गंभीररित्या जखमी झाले होते,
त्यांना तातडीने येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले मात्र अति रक्तस्त्राव झाल्याने तिवाटणे यांना पंढरपुर येथे पुढील उपचार्थ नेत असताना वाटेतच त्यांचे निधन झाले,
राकेश तिवाटणे हे नेहमीच सर्वांसाठी धावुन जाणारे व्यक्तीमत्व म्हणुन परिसरात सुपरिचित होते. त्यामुळे शहरात त्यांचा मोठा मित्र परिवार आहे. हे वृत्त समजताच अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली.
अत्यंत शोकाकुल वातावरणात येथील वैकुंठ स्मशान भुमीत त्यांच्यावर दफनविधी करण्यात आला. त्यांच्या कुटुंबियांनी महानभव पंथ स्विकारल्याने त्या पंथानुसार त्यांच्यावर संस्कार करण्यात आले.
यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता, या निमित्त येथील माळशिरस चौक, मायणी चौक व शिंगणापुर चौक याठिकाणी गतिरोधक उभारण्याची मागणी अनेकांकडुन व्यक्त करण्यात आली.
दरम्यान राकेश तिवाटणे हे पालिका अभियंता नितीन तिवाटणे यांचे धाकटे बंधु असुन त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.
दरम्यान राकेश तिवाटणे यांचे सोबत पाठीमागे बसलेले शहाजी माने हे सुध्दा गंभीर जखमी असल्याचे समोर येत आहे. त्यांच्यावर सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!