एल के सरतापे/ म्हसवड :- फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्याल आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या विद्यमाने शिक्षणातून पर्यावरण, स्वच्छता आरोग्य आणि सामाजिक बांधिलकीचे व्रत घेऊन भाटकी या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना विभागा अंतर्गत “निसर्गजपा, आरोग्य वाढवा” या ब्रीदासह ‘विशेष श्रमसंस्कार शिबीर’चे या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाच्या विकास समिती उपाध्यक्ष,गौ.कौ.सोसा.सदस्य अॅड.पृथ्वीराज राजेमाने यांचे हस्ते करण्यात आले यावेळी भाटकी ग्रामपंचायत सरपंच गिरीजा चव्हाण, पोलिस पाटील हर्षादा शिर्के,माजी विद्यार्थी संघटनेचे विलास रुपनवर प्राचार्य डॉ एस जी दिक्षित उपस्थित होतेश्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयाच्या वतीने भाटकी याठिकाणी मंगळवार दिनांक ३० डिसेंबर तेसोमवार दि.०५ जानेवारी २०२६ अखेर विशेष श्रमसंस्कार शिबीर’चे आयोजन करण्यात आले दिनांक ३१ रोजीजलसंधारणातुन ग्रामविकास या विषयावर किरकसालचे आदर्श सरपंच अमोल काटकर मार्गदर्शन करणार आहेत गुरुवार दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मायणी काॅलेजचे प्राचार्य डॉ गोरोबा खुरपे, शुक्रवार दिनांक २ डिसेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश कुलकर्णी, डॉ सुप्रिया विरकर, शनिवार दिनांक ३ जानेवारी रोजी ग्रामीण भागातील तरुणांपुढील आव्हाने या विषयावर लेखक पत्रकार अजित काटकर मार्गदर्शन करणार आहेत रविवार दिनांक ४ जानेवारी रोजी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आरोग्य या विषयावर पंढरपूर करकंब आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ ओंकार माळी मार्गदर्शन करणार आहेत तर सोमवार दिनांक ५ रोजी वैद्यकीय अधिकारी म्हसवड येथील डॉ प्रज्ञा क्षीरसागर नेत्र तपासणी होणार आहेया विशेष श्रमसंस्कार शिबीरा मध्ये जलसाक्षरता, ग्रामस्वच्छता, पशु चिकित्सा, व्यसनमुक्ती,पर्यावरण जागृती, संगणक साक्षरता, आपत्कालीन व्यवस्थापन, निर्मलग्राम अभियान,बंधारा निर्मिती,लेक वाचवा ,देश वाचवा,बेटी बचाव बेटी पढाव आणि नव मतदार नाव नोंदणी असे उपक्रम या शिबिरात होणार आहेया शिबिराचे संयोजक प्रा.डाॅ .वाय वाय दुबाले,प्रा .ए.एम. लांब सह सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते Post navigation .ग्रामीण भागातील खेळाडू हीच माझी खरी संपत्ती : मा.प्रभात सिन्हा म्हसवडजवळ भरधाव कारची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू