म्हसवड पोलिस ठाण्यात अपघातप्रकरणी गुन्हा दाखलमाण (सातारा) | प्रतिनिधीम्हसवड–मायणी रस्त्यावर मसाईवाडी (ता. माण) गावच्या हद्दीत शिवनेरी ढाब्याजवळ भरधाव कारने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना 31 डिसेंबर 2025 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.या अपघातात दत्तात्रय किसन खाडे (वय 45, रा. ढाकणी, ता. माण, जि. सातारा) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ते बजाज प्लॅटिना मोटरसायकल (MH 11 BQ 7910) वरून म्हसवड येथून ढाकणी येथे घरी जात असताना हा अपघात झाला.अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी इलाउद्दीन नसरूद्दीन सय्यद (रा. दिवड, ता. माण, जि. सातारा) याच्याविरुद्ध म्हसवड पोलिस ठाण्यात गु.र.नं. 02/2026 अन्वये BNS 106, 281, 125(A), 125(B) तसेच मोटार वाहन अधिनियम कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी मयताचा चुलत भाऊ तुकाराम शंकर खाडे (वय 62, रा. ढाकणी) यांनी फिर्याद दिली असून, संबंधित आरोपीने महिंद्रा झायलो कार (MH 05 BJ 1314) भरधाव व निष्काळजीपणे चालवून दुचाकीला जोराची धडक दिल्याचा आरोप आहे.गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक ए. ए. वाघमोडे करत असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. Post navigation श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयाच्या वतीने श्रम संस्कार शिबिर जनश्री फाउंडेशन दिनदर्शिकेचे ना.जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रकाशन