संत गाडगे महाराज पुण्यतिथी व पारितोषिक वितरण सोहळा दिमाखात संपन्न
माणगंगा शैक्षणिक संकुल, मासाळवाडी (म्हसवड) येथे शनिवार, दि. 20 डिसेंबर 2025 रोजी श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी सोहळा व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमास मा. प्रभातदादा सिन्हा (अध्यक्ष – माणदेशी चॅम्पियन) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात करण्यात आली.प्रभात सिन्हा यांनी मासाळवाडी सारख्या या माळावरती खुप चांगले शैक्षणिक संकुल उभारले. सौ सविता मॅडम व डॉ वसंत मासाळ यांनी श्री संत गाडगे महाराज यांच्या समाजप्रबोधनात्मक गाडगे महाराजांच्या कार्याचा खऱ्या अर्थाने वसा चालवला आहे. येथील गरीब दिन दलित, गरजू मुलांसाठी हे संकुल उभा केले, या संकुलतात सर्व प्रकारचे शिक्षण, क्रीडा, प्रवासाची सोय चांगल्या प्रकारे केली आहे,हे भविष्यातील नामांकित संकुल होईल. पुढे त्यांनी भारत देशात चाललेल्या घडामोडी मुलांना त्यांच्याच भाषेत प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. संस्थापक डॉ वसंत मासाळ यांनी स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन व समाजसेवा याबाबत संत गाडगे महाराजांचे विचार आजच्या पिढीसाठी किती महत्त्वाचे आहेत, यावर त्यांनी प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक व नैतिक मूल्यांबाबत मार्गदर्शन करत यशासाठी सातत्य, शिस्त व कष्टाचे महत्त्व सांगितले.
यानंतर शैक्षणिक वर्षात आयोजित करण्यात आलेल्या खो-खो, टेन्निकोईट, शंभर मीटर रिले, व्हॉलीबॉल तसेच समूह नृत्य (ग्रुप डान्स) या विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, मेडल, प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर आनंदमय झाला होता.
या कार्यक्रमास संस्था संचालिका डॉ. सविता मासाळ, प्राचार्य रावसाहेब मासाळ सर,समन्वयक प्रा फुटाणे सर, कॉलेज उप प्राचार्या करमाळकर मॅडम,जि प शाळा मुख्यद्यापक ओतारी सर, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे यशस्वी झाले. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
.ग्रामीण भागातील खेळाडू हीच माझी खरी संपत्ती : मा.प्रभात सिन्हा
