आटपाडी (वार्ताहर)-आटपाडी तालुक्यांमध्ये इंडियन गॅस एजन्सी आटपाडी , भारत गॅस एजन्सी खरसुंडी, एचपी गॅस एजन्सी दिघंची अशा गॅस एजन्सी आहेत. तर कलेढोण ता. खटाव येथील भारत गॅस एजन्सी चे काही कनेक्शन झरे परिसरामध्ये आहेत ,तर वरकुटे येथील इंडियन गॅस एजन्सी चे काही कनेक्शन आहेत. तसेच गॅस एजन्सी खरसुडी या एजन्सीचे सुद्धा कनेक्शन या परिसरामध्ये आहेत.परंतु सध्या इंडियन गॅस एजन्सी आटपाडी व भारत गॅस एजन्सी खरसुंडी यांच्याकडे जास्त कनेक्शन आहेत . या दोन्ही गॅस एजन्सीच्या गॅस सिलेंडरच्या गाड्या आठवड्यातून दोन वेळा झरे परिसरामध्ये येत असतात. भारत गॅस एजन्सी खरसुंडी ची गाडी सकाळच्या सत्रामध्ये येत असते. तर इंडियन गॅस एजन्सी च्या गाडीची गॅरंटी नसते. दिवसभरात कधी येऊ शकते त्यामुळे ग्राहकांना दिवसभर गॅस घेण्यासाठी मोकळा सिलेंडर घेऊन बस स्थानकावर किंवा एखाद्या दुकानाच्या समोर बसावे लागते. त्या गाडीची वाट पहावी लागते यामुळे नागरिकांचा दिवस ना दिवस वाया जातो.या परिसरामध्ये सर्वच शेतकरीवर्ग आहे.आणि शेतीचा कामधंदा सोडून गॅस घेण्यासाठी गाडीची वाट पाहून राहावे लागते. त्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास होत आहे. याबाबत इंडियन गॅस एजन्सी च्या मालकांना अनेक वेळा अनेक नागरिकांनी सांगितले की सरासरी सकाळच्या सत्रात गॅसची गाडी पाठवून देत जावा. परंतु या गोष्टीकडे गॅस एजन्सी चे मालक सतत कानाडोळा करीत आहेत .त्यामुळे घरची व शेतीची कामे सोडून गॅस सिलेंडर घेण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. गाडी कधी येईल सांगता येत नाही.एजन्सी मालकाकडे किंवा वाहन चालकाकडे फोन द्वारे संपर्क केला असता अर्ध्या तासात आलो, पंधरा मिनिटात आलो अशी उत्तरे दिली जातात .परंतु दिवसभर गाडी घेत नाही व सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांना दिवस दिवस काम धंदा सोडून वाट पाहत बसावे लागत आहे.याबाबत गॅस एजन्सीच्या मालकाकडे अनेक वेळा नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत ,तेवढ्यापुरते एखादा दुसरा दिवस गाडी वेळेवर येथे पुन्हा मागले दिवस पुढे अशी अवस्था सतत होत असते. अनेक वेळा ड्रायव्हर कामगार व मालक यांच्याशी नागरिकांची याबाबत बाचाबाची सुद्धा झालेली आहे.ग्रामीण भागामध्ये शेतकरी वर्ग जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग गावांमध्ये जास्तीत जास्त 11 ते 12 वाजेपर्यंत थांबत असतो. परंतु या वेळेत इंडियन गॅस एजन्सी ची गाडी येत नाही. कधी दोन वाजता येते कधी तीन वाजता येते कधी पाच वाजता येते अशी अवस्था असल्याने गॅस सिलेंडर घेण्यासाठी दिवसांन दिवस नागरिकांना वाट पहावी लागते. यामध्ये गॅस एजन्सीने कुठेतरी बदल करावा सर्वसाधारणपणे तालुक्याच्या शेवटच्या टोकाला अकरा ते बारा वाजेपर्यंत सिलेंडरची गाडी यावी व नागरिकांना सिलेंडर मिळावा अशी मागणी नागरिकातून होत आहे.जर गॅस एजन्सी मालकाला वेळेचे बंधन ठेवता येत नसेल तर त्यांनी जवळच्या म्हणजेच वरकुटे ता. माण येथील एजन्सीकडे या परिसरातील कनेक्शन ट्रान्सफर करावीत अशीही मागणी नागरिकांतून होत आहे. Post navigation चंद्रपूर येथे 28 डिसेंबर रोजी भारतीय संविधान सन्मान – राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सत्यशोधक रघुनाथ ढोक होणार सन्मानित .ग्रामीण भागातील खेळाडू हीच माझी खरी संपत्ती : मा.प्रभात सिन्हा