.प्रतिनिधी वडूज विनोद लोहार
_ *डिसेंबर 2025 मध्ये इयत्ता आठवी साठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत (NMMS परीक्षेत) छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ वडूज चे छत्रपती शिवाजी हायस्कूल चे एकूण 17 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरलेल्या विद्यार्थ्यांचा मा श्री पृथ्वीराज गोडसे (बाबा) यांच्या हस्ते पुष्प गुच्छ देऊन सन्मानित केला या प्रसंगी मा श्री जे एच जाधव मुख्याध्यापक, श्री एम आर गोडसे उप मुख्याध्यापक, श्री एस बी कदम व श्री पी आर राऊत पर्यवेक्षक तसेच श्री वैभव इमानदार उपस्थित होते.*
सदर शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना दरवर्षी 12,000 रुपये प्रमाणे एकूण 48000 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
विभाग प्रमुख – श्री पवार व्ही व्ही
मार्गदर्शक शिक्षक– सौ गोडसे एम. एन., श्री मुल्ला आर्. बी., श्री जगताप ए. एम., गोडसे एस. एस.,बैरागी पी.के. म्हणून काम पाहिले
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा श्री. दादासाहेब गोडसे, उपाध्यक्ष मा श्री. पृथ्वीराज गोडसे, सचिव मा श्री व्ही. आर. गोडसे, विकास अधिकारी मा श्री आर. एन. घाडगे, मुख्याध्यापक मा श्री जे.एच.जाधव , उपमुख्याध्यापक ,पर्यवेक्षक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संचालक ,सदस्य ,पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *