मायणी प्रतिनिधी–

–कुस्ती जगतातील महाराष्ट्र चॅम्पियन नावाजलेला कुस्ती खेळाडू पैलवान राहुल दशरथ कोरडे व 21 यांचे याची मेंदूचा रक्तस्राव झाल्याने दुःखद निधन झाले राहुल कोरडे हा कुस्ती जगतातील नामवंत खेळाडू होता मायणी व परिसरात 50000 ते एक लाख रुपयाची कुस्ती तो करत असे त्याची पकड मजबूत होती दिसा डावावर तो हमखास कुस्ती जिंकत असे महाराष्ट्र केसरी बनण्याची त्याचे स्वप्न होते त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती थोरला भाऊ रोहित हा देखील कुस्ती करत आहे .

परंतु आपल्या लहान भावाला महाराष्ट्र केसरी बनवण्याचे स्वप्न त्याने पाहिली होते त्यामुळे त्याने कुस्ती सोडून घरच्या कारभारात लक्ष दिले होते त्यांची कुटुंब हे गरिबीत राहिलेले असल्याने दोघांनाही मोलमजुरी करावी लागत असे तसेच जय बजरंग बली मित्र मंडळाच्या आर्थिक सहाय्याने तो महाराष्ट्र केसरी होईल आणि सर्वांना आशा होती पण ती अशा आता फेल ठरली आहे मायणी येथील विठोबा यात्रेत कुस्त्यांचे आयोजन केले होते .या कुस्तीमध्ये त्याने विठोबा केसरी ढाल व एक लाख रुपये रोग बक्षीस मिळवले होते .त्याच्या जाण्याने मायणी परिसरात व कुस्ती जगतात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!