जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी कटिबद्ध: पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे

सातारा : जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा निर्वाळा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिला.
नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून निखिल पिंगळे यांचे पुष्पगुच्छ व संविधान प्रस्ताविका देऊन महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा शेलार व बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर स्वागत केले.तदनंतर निवेदनही देऊन सविस्तर चर्चा-विनिमय करण्यात आला. तेव्हा पिंगळेसाहेब बोलत होते.
“कायदा व सुव्यवस्था विषयक मुद्द्यांबाबत सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच भारतीय संविधानाची प्रस्तावना भेट देत त्यांना अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी पत्रकार व बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर उपस्थित होते.
सदरच्या निवेदनामध्ये जिल्ह्यात वाढत असलेल्या सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक, महिलांवरील अत्याचार, छेडछाड व कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामीण भागात पोलीस गस्त वाढवून चोरी व घरफोडी रोखाव्यात. तसेच शाळा व महाविद्यालय परिसरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात.अवैध दारू विक्री व अंमली पदार्थांवर कठोर कारवाई, वाहतूक कोंडी व अपघातप्रवण ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवणे तसेच सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करून जनजागृती करावी.विशेषतः महिलांविरोधात अश्लील व अपमानास्पद भाष्य करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.महिला हेल्पलाईन अधिक कार्यक्षम करणे,गावपातळीवर पोलीस-नागरिक समन्वय वाढवणे,भाडेकरू नोंदणी प्रक्रिया प्रभावी करणे, सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, नागरिकांच्या तक्रारींचे जलद व पारदर्शक निवारण व्हावे. यासाठी विशेष यंत्रणा उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.याशिवाय, पोलीसांनी तक्रारदारांशी संवेदनशील व सन्मानपूर्वक वागावे. सातारा पोलिसांच्या प्रतिमेला धक्का लागू नये. यासाठी शिस्त बळकट करावी. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या कल्याण व ताणतणाव व्यवस्थापनावरही लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येकडेही लक्ष वेधण्यात आले असून नगरपरिषद व वाहतूक पोलीसांनी तात्काळ कारवाई करून रस्ते व सार्वजनिक जागा मोकळ्या ठेवाव्यात.अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

फोटो : पो.अधीक्षक निखिल पिंगळे यांना निवेदन सादर करताना प्रतिभा शेलार शेजारी अनिल वीर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *