ऋतुजा म्हेत्रे हिचा अहिंसा पतसंस्थे कडून कौतुक म्हसवड वृत्तसेवाअहिंसा पतसंस्थेच्या वतीने ऋतुजा म्हेत्रे हिचा सत्कार करून कौतुक करण्यातं आले. आणि तो सत्कार म्हसवड नगरीच्या कार्यकुशल उपनगराध्यक्षा सौ श्रीदेवी निशांत पिसे यांचे अध्यक्षतेखाली पार पडला. सर्वप्रथम म्हसवड नगरीच्या उपनगराध्यक्ष पदी निवड झालेबद्दल सौ.श्रीदेवी निशांत पिसे यांचे अहिंसा पतसंस्थेचे कुटुंबप्रमुख व माजी नगराध्यक्ष सन्मानीय नितिन भाई दोशी यांचे शुभहस्ते शाल व श्रीफळं देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी आलेल्या सर्व प्रमुख पाहुणे व ऋतुजा च्या पालकांचे श्रीफळं देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना जेष्ठ पत्रकार आण्णासाहेब टाकणे म्हणाले कि, म्हसवड नगरी मध्ये एखाद्याने यश संपादन केले आणि नितिन दोशी साहेबांनी त्यांचा सत्कार घेतला नाही असे कधी झाले नाही मग ते कोणतेही क्षेत्र असो सामाजिक, शैक्षणिक, अर्थ, क्रीडा, राजकारण यामध्ये शाबासकीचा पहिला मान नितिन काकांचा असतो.ते पुढे म्हणाले कि ऋतुजा ने मिळवलेले यश हे सर्वसामान्य घरातील मुला मुलींना एक प्रेरणा आहे. आणि तिने एवढ्यावर न थांबता यशाच्या पुढच्या पायऱ्या सर कराव्यात.अहिंसा पतसंस्थेचे कुटुंबप्रमुख व म्हसवड नगरपरिषदे चे माजी नगराध्यक्ष नितिन भाई दोशी म्हणाले कि तुझ्या यशाची रेल्वे आता कोणत्याच स्टेशन ला न थांबता यशाच्या शेवटच्या स्टेशन पर्यंत पोचले पाहिजे. तू फक्त रेल्वे पोलीस च न राहता आणखी पुढची पद तुझ्या बौद्धिक चातुर्याने मिळवशील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ते पुढ म्हणाले कि, आज म्हसवड च्या विद्यमान उपनगराध्यक्षा सौ श्रीदेवी पिसे यांनी कामाचा धडाका तर लावला आहेच, त्याबद्दल शंकाच नाही, आपल्या कडून जास्तीत जास्त सत्कार्य घडावे, त्यांचे पती निशांत पिसे यांचा जनसंपर्क खूप चांगला आहे, त्यांनी फक्त एका समाजापुरते एवढाच मर्यादित न ठेवता म्हसवड मधील सर्व जाती धर्मातील युवकांना सोबत घेऊन आपले सामाजिक व राजकीय कार्य अखंड चालू ठेवावे.म्हसवड करांना तुमच्याकडून कडून खूप अपेक्षा आहेत.उपनगराध्यक्षा श्रीदेवी पिसे म्हणाल्या कि म्हसवड च्या विकासासाठी कटीबद्द आहे. व युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्न करेन.सत्कार मूर्तीच्या भाषणात ऋतुजा म्हणाली कि या पतसंस्थेने जो माझा सत्कार केला आदरतिथ्य केल. मी आपली नेहमी ऋणी असेन. व आपले मार्गदर्शनानुसार मी माझी पुढची वाटचाल करेन.या कार्यक्रम प्रसंगी म्हसवड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सुरेश म्हेत्रे,निशांत पिसे,शिवाजी म्हेत्रे, ऋतुजा चे आई वडील, बाळासाहेब म्हेत्रे, अहिंसा पतसंस्थेचे व्हा. चेअरमन अभिराज गांधी, संचालक अनिल गाडे, बाळासाहेब सरतापे, धवल व्होरा,संस्थेचे कर्मचारी व अधिकारी तसेच म्हसवड मधील सुजाण नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितिन वाडेकर यांनी केले. तर आभार हरिदास मासाळ यांनी मानले. Post navigation जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी कटिबद्ध: पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे सेवाग्रामच्या बापू कुटीत नोव्हेंबरमध्ये रंगणार सहावे राज्यस्तरीय साहित्य संमेलन