​वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे हक्काचे दालन उपलब्ध –
ना जयकुमार गोरे

​दहिवडी (प्रतिनिधी):
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या शुभहस्ते दहिवडी येथे ‘चैतन्य अभ्यासिकेचा’ भव्य उद्घाटन सोहळा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गेल्या १९ वर्षांपासून पोलीस व सैन्य दलात हजारो तरुण घडविणाऱ्या ‘चैतन्य करिअर अकॅडमी’ने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक तयारीसाठी हे हक्काचे दालन खुले केले आहे.


​या प्रसंगी श्री सिद्धनाथ पतसंस्थेच्या संचालिका मा. सौ. सोनियाताई जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला दहिवडी नगराध्यक्षा मा. सौ. वर्षाराणी सावंत, मुख्याधिकारी मा. संदीप घार्गे, स.पो.नि. मा. दत्तात्रय दराडे, माजी सभापती मा. अतुल जाधव यांची विशेष उपस्थिती लाभली.
​ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी यशाची गुरुकिल्ली:
उद्घाटनानंतर बोलताना ना. जयकुमार गोरे म्हणाले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली असते, मात्र त्यांना योग्य सोयी-सुविधांची गरज असते. खाडे सर यांनी अकॅडमीच्या माध्यमातून शारीरिक प्रशिक्षणासोबतच आता ‘अभ्यासिकेच्या’ रूपाने बौद्धिक तयारीसाठी दिलेली ही सुविधा विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा देणारी ठरेल.”
​मान्यवरांची मांदियाळी:
या सोहळ्यासाठी दहिवडी व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये मा. छोटू काका, चैतन्य पतसंस्थेचे चेअरमन नंदकुमार खोत, हरित वसुंधराचे कारंडे काका, BJS अध्यक्ष भरतेशशेठ गांधी, दादासाहेब जगदाळे (मलवडी), ब्रह्माकुमारी रूपा दीदी व योगिता दीदी, सुवर्णा गुंडगे, बाळासाहेब सावंत, संदीप महाडिक, विशाल घोरपडे, शिवराज शेंडे, दीपक म्हेत्रे, सिकंदर शेख यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
​प्रशासकीय सेवेसाठी हक्काची जागा:
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अकॅडमीचे संचालक खाडे सर यांनी सांगितले की, “चैतन्य करिअर अकॅडमीने आजवर ४००० पेक्षा जास्त यशस्वी विद्यार्थी घडवले आहेत. केवळ मैदानी प्रशिक्षण पुरेसे नसून लेखी परीक्षेसाठी एकाग्रतेने अभ्यास होणे गरजेचे आहे, याच हेतूने सर्व सोयींयुक्त अशी वातानुकूलित ‘चैतन्य अभ्यासिका’ आम्ही सुरू केली आहे.”
​कार्यक्रमाच्या शेवटी चैतन्य अकॅडमी परिवाराच्या वतीने उपस्थित सर्व मार्गदर्शक, हितचिंतक, पालक आणि आजी-माजी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. “तुमची जिद्द, आमची साथ; यशाचा नवा इतिहास!” या ब्रीदवाक्यासह या अभ्यासिकेचा शुभारंभ झाल्याने विद्यार्थी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!