मायणी प्रतिनिधी——-मायणी येथील वीरशैव समाज बांधवांनी महात्मा बसवेश्वराची 893 वी जयंती उत्साहात व शोभायात्रा काढून साजरी करण्यात आली ही समाजबांधवाची एकी कौतुकास्पद आहे असे मत डॉक्टर. तांबेकर यांनी व्यक्त केली सकाळी महात्मा बसवेश्वराच्या प्रतिमेचे विधिवत पूजन औंधकर मठात संपन्न झाली त्यानंतर महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला संध्याकाळी सहा वाजता महात्मा बसवेश्वराच्या प्रतिमेची वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत वीरशैव समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सदर मिरवणूक ही चांदणी चौकात आल्यावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली रात्री मिरवणूक मठात आल्यानंतर महात्मा बसवेश्वर ची मंगल आरती करण्यात आली त्यानंतर महेश पुस्तके यांनी आपले मनोगत व्यक्त केली. या मनोगत त्यांनी सांगितले की स्त्री-पुरुषांना समान अधिकार देणारा लिंगायत हा प्राचीन धर्म आहे बसवेश्वर यांनी सर्व समाज बांधवांना एकत्र करून लिंगायत धर्माची दीक्षा दिली कष्ट करून उदरनिर्वाह करा असा संदेश त्यांनी दिला या कार्यक्रमास संजय गुदगे, दिलीप जगन्नाथ देशमुखे, डॉक्टर दत्तात्रय तांबवेकर, विजय खलीपे, नंदकुमार पुस्तके, अरविंद पुस्तके सर, दत्तात्रय पुस्तके, विश्वनाथ पुस्तके, सुनील खलीपे तसेच युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी उमेश पुस्तके यांनी सर्वांचे आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!