श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचा प्रसाद ममाळे याची करिअर कट्टा धाराशिव जिल्हा समन्वयक व छत्रपती संभाजीनगर विभागीय प्रतिनिधी म्हणून निवड

(मुरुम प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायत्ता केंद्र आयोजित करिअर कट्टा अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी संशोधन नियोजन समितीच्या धाराशिव जिल्हा समन्वयक व छत्रपती संभाजीनगर विभागाचा विभागीय प्रतिनिधी म्हणून श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचा प्रसाद मम्माळे या विद्यार्थ्यांची निवड करिअर कट्ट्या अंतर्गत करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील करियर कट्टा नियोजन समिती च्या मतदानाद्वारे ही निवड करण्यात आली आहे. महाविद्यालयात करिअर कट्टा उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि त्यांच्या करिअरला दिशा देण्यासाठी यशस्वीरित्या राबवला जातो. या करीअर कट्ट्यांतर्गत कु.आणिशा सुरवसे हीची दिल्ली दौऱ्यासाठी निवड झाली होती तर गणेश मोरे हा सध्या टेक्निकल इंटर प्रमुख म्हणून राज्य पातळीवर काम करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुढील शैक्षणिक वर्षासाठी श्री. प्रसाद मम्माळे याची निवड करण्यात आलेली आहे. तो यावर्षी बी.ए.द्वितीय वर्षात शिकत असून करिअर कट्ट्याअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या प्रत्येक उपक्रमांमध्ये त्याचा सहभाग असतो. त्याच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी सत्कार करून त्यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन करिअर कट्टा हा उपक्रम इतर महाविद्यालयांमध्येही प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
याप्रसंगी महाविद्यालयीन समन्वयक प्रा. डॉ. चंद्रसेन करे, प्रा. डॉ. समाधान पसरकल्ले व करिअर कट्ट्यातील विद्यार्थी कु.दिशा सुरवसे, कु.योगेश्वरी मारकड,इनामदार सैफ, सुशील सूर्यवंशी, गणेश मोरे, कु.पूजा हांडे आणि प्रियंका इंगळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!