म्हसवड वार्ताहरग्रामीण भागातील सर्व ग्रामस्थ व पालकांनी शासनाच्या विविध योजननेच लाभ घेण्याचे आवाहन म्हसवड तहसीलच्य अप्पर तहसीलदार मीना बाबर यांनी शिरताव येथील महा राजस्व अभियान शिबरात केले.ख्यमंत्री सो आणि मा महसूल मंत्री सो यांच्या नवीन संकल्पनेतून आज दिनांक 17/04/2026 रोजी शिरताव येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर टप्पा 1 आयोजित केले होते त्याकरिता मा.अपर तहसिलदार सो म्हसवड श्रीमती मीना बाबर, शिरताव सरपंच श्री हणमंत वीरकर , उपसरपंच सावित्री सतीश सरतापे, वैशाली लुबाळ , देवापूर सरपंच तात्यासाहेब औताडे , ग्रामपंचायात सदस्य सुनील मदने, अंकुश पिंगळे,नंदा लुबाळ, सुवर्णा चव्हाण, सखाराम चंदनशिवे, प्रतिष्ठीत नागरिक पोपट चव्हाण, इतर गावचे ग्रामस्थ तसेच म्हसवड मंडल अधिकारी श्री उत्तमराव अखडमल ग्राममहसूल अधिकारी श्रीमती माधुरी चव्हाण, म्हसवड ग्राम महसूल अधिकारी श्री अजित भोसले सर्व पोलीस पाटील ,महसूल सेवक, रास्त भाऊ दुकानदार, अंगणवाडी सेविका व अपर तहसिल कार्यालय मधील सर्व मंडल अधिकारी तसेच तहसिल कार्यालय मधील पुरवठा शाखा, संजय गांधी शाखा, कृषी विभाग, आरोग्य विभाग,पंचायत समिती, बचतगट तसेच शासनाचे विविध विभागाचे कर्मचारी उदघाटनास हजर होते तसेच सर्व विभागाचे प्रमुख, मंडवळातील सर्व सरपंच ,मान्यवर उपस्थित होते त्यावेळी वेगवेगळे लाभ लाभार्थी यांना वाटप केले .त्यामध्ये निकाली काढण्यात आलेले फेरफार ,. 7/12 दुरुस्ती अर्ज ,डिजिटल 7/12 वाटप ,. 8 अ वाटप संख्या , वितरित करण्यात आलेले विविध प्रमाणपत्र , एक खिडकी अंतर्गत निकाली काढण्यात आलेले प्रमाणपत्र ,. लक्ष्मी मुक्ती योजना अंतर्गत देण्यात आलेले 7/12 ,अग्रीस्टॅक योजना, अकृषक बाबत नवीन gr अन्वये वसुली बाबत माहिती त्याअनुषंगे भरलेली चलन ,. मंडळातील मोकळे केलेले पानांद रस्ते ,.एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प,.शिक्षण विभाग अंतर्गत योजना,.घरकुल विभाग पंचायत समिती ,. आरोग्य विभाग अंतर्गत लाभ, संजय गांधी अंतर्गत लाभपुरवठा विभाग अंतर्गत सर्व दाखले ग्रामस्थांना वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पाटोळे यांनी केले व आभार तलाठी माधुरी चव्हाण यांनी मानले. Post navigation साताऱ्यात दिव्यांगांच्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात आंदोलनाचा इशारा तुषार दोशी यांची अखेर बदली.. पहा सविस्तर वृत्त