तुषार दोशी यांची अखेर बदली.. पहा सविस्तर वृत्त

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; राज्य शासनाचा आदेश जारी

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदस्थापना संदर्भात महत्त्वाचा शासन आदेश जारी केला आहे. दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या या आदेशानुसार राज्यातील विविध जिल्ह्यांतील पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदली करून नवीन पदस्थापना करण्यात आली आहे.

या आदेशानुसार तुषार दोषी यांची सातारा येथील पोलीस अधीक्षक पदावरून सांगली येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. निखिल पिंगळे यांची पुणे येथील पोलीस उप आयुक्त पदावरून सातारा येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संदीप घुगे यांची सांगली येथून मुंबई येथे राज्य गुप्तवार्ता विभागात पोलीस उप आयुक्त (सुरक्षा) म्हणून बदली करण्यात आली आहे.

याशिवाय योगेश गुप्ता यांची कोल्हापूर येथील पोलीस अधीक्षक पदावरून गडचिरोली परिक्षेत्रात पोलीस उप महानिरीक्षक (कार्यभार) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निलोफर (निलोत्पल) यांची गडचिरोली येथून कोल्हापूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. एम. रमेश यांची अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली येथून पोलीस अधीक्षक, गडचिरोली पदावर पदोन्नतीसह बदली करण्यात आली आहे.

महेंद्र रेड्डी यांची जळगाव येथील पोलीस अधीक्षक पदावरून पुणे येथे राज्य गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाली आहे. श्रीकांत दिवे यांची धुळे येथून जळगाव येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राजकुमार शिंदे यांची पुणे येथील पोलीस उप आयुक्त पदावरून वाशीम येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

राज्याचे पोलीस महासंचालक यांनी कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन या बदल्यांनुसार पुढील आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ नवीन पदस्थानी रुजू होण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

हा शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, राज्यपालांच्या आदेशानुसार व नावाने जारी करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *