पिंपोडे बुद्रुक प्रतिनिधी अभिजीत लेंभे

जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी उपमुख्यमंत्री यांच्या सातारा दौऱ्यादरम्यान त्यांच्या वाहनासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक, सातारा यांना निवेदन देण्यात आले असून, त्यात दिव्यांगांच्या अनेक मूलभूत समस्या अद्यापही न सुटल्याचे नमूद करण्यात आले आहे. दिव्यांग बांधवांची पेन्शन वेळेत मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली असून, काहींना ठरलेली रक्कमही अपुरी मिळत असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, दिव्यांगांना विनाअट घरकुल योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, आमदार व खासदार निधीतून दिव्यांगांसाठी राखीव तरतुदी असूनही प्रत्यक्षात निधी वितरित करण्यात आलेला नाही. तसेच, शंभर टक्के अंध असलेल्या लतिका जगताप यांचे घर उध्वस्त झाल्याची गंभीर बाबही समोर आली आहे.
दिव्यांगांवर खोटे गुन्हे दाखल होणे, पोलिसांकडून होणारा त्रास व मानसिक छळ याबाबतही संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. या सर्व मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत बगले यांनी दिला आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *