मायणी ता.खटाव(सतीश डोंगरे):
माण-खटावचे लोकनेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमारजी गोरे व खटावचे माजी आमदार मा. दिलीपराव येळगावकर यांच्या खंबीर नेतृत्वाखाली मायणी गटाचे जिल्हा परिषद सदस्य मा. सूरज (दादा) शिवाजीराव पाटील यांची सातारा जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण आणि शिक्षण व क्रीडा या दोन महत्त्वपूर्ण समितीवर निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे संपूर्ण मायणी परिसरात आनंदाचे वातावरण असून भारतीय जनता पार्टीच्या वतीने फटाक्यांच्या अतिषबाजीत विजयोत्सव साजरा करण्यात आला.
नेतृत्वावरील विश्वास सार्थ राखत
ना. जयकुमार गोरे आणि मा. दिलीपराव येळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या प्रयत्नातून सूरज दादा पाटील यांनी मायणी गटात विकासाचे जाळे विणले आहे. त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाने आणि जिल्हा परिषदेने त्यांच्यावर ही दुहेरी जबाबदारी सोपवली आहे. या निवडीबद्दल बोलताना कार्यकर्त्यांनी सांगितले की, “दादांच्या निवडीमुळे आता समाजकल्याण विभागाच्या योजना थेट गरजूंपर्यंत पोहोचतील आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना व विद्यार्थ्यांना नवी संधी प्राप्त होईल.”मायणी भागातील शिक्षणक्षेत्राना बळकटी मिळेल
निवडीची बातमी मायणीत पोहोचताच भाजपा कार्यकर्त्यांनी आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत मुख्य चांदणी चौकात यावेळी फटाक्यांच्या वाजात आनंद उत्सव साजरा केला .
या निवडीबद्दल नामदार जयकुमार गोरे, माजी आमदार दिलीपराव येळगावकर, मायणीतील सर्व भाजपा पदाधिकारी, विविध संस्थांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी सूरज दादांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!