म्हसवड….प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यात शिवसेनेच्या मूळ सर्व विभागाच्या माध्यमातून बळीराजाला न्याय देण्यासाठी शेतकरी सेनेचे संघटन मजबूत करणार असल्याचा निर्धार शेतकरी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी पुणे जिल्हा संपर्क दौऱ्या दरम्यान केले.
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्याच्या शेती संलग्न विविध मागण्या पूर्ण करून बळीराजाला न्याय देण्यासाठी शिवसेना अंतर्गत शेतकरी सेनेचे संघटन वाढविण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे जाहीर केलेले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी सेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रा.
जालंदर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी 16 एप्रिल 2026 रोजी पुणे जिल्ह्याचा दौरा केला. यानिमित्ताने त्यांनी पुणे जिल्ह्यातील शिवसेना नेते माजी आमदार रवींद्र
धंगेकर, जुन्नर, व आंबेगाव चे शिवसेना जिल्हाप्रमुख देविदास दरेकर, पुरंदर व हवेली चे शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल म्हस्के, भोर, व कोथरूडचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, बारामती, व इंदापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे, दौंडचे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश दादा पासलकर इत्यादी मान्यवरांच्या भेटी घेऊन शेतकरी सेना संघटन वाढविणे बाबत चर्चा केली. आपली संकल्पना खूप चांगली असून शेतकरी सेनेच्या माध्यमातून बळीराजाला न्याय देण्यासाठी आम्ही तुम्हाला ताकद देऊ अशी ग्वाही अनेक मान्यवरांनी प्रा. विश्वंभर बाबर यांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!