म्हसवड वृत्तसेवा
माण तालुक्यातील शिरताव येथे म्हसवड मंडळातील विविध गावातील लोकांचे शासकीय दाखले जागेवरच मिळण्यासाठी महाराजस्व अभियान शिबिर शुक्रवार दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी ग्रामपंचायत शिरताव येथे आयोजित केले आहे. माननीय मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांच्या संकल्पनेतून व महाराष्ट्र शासन महसूल विभाग यांच्या परिपत्रकानुसार शासन निर्णयप्रमाणे शासन आणि नागरिक यांच्यामध्ये अधिक विश्वासार्हता वाढावी तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाच्या प्रशासकीय अडचणी तात्काळ सोडवल्या जाव्यात आणि प्रशासन हे सर्वसामान्य नागरिकांना आपलेसे वाटावे यासाठी शासनाने शासनाने छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर आयोजित केले आहे. म्हसवड मंडळातील म्हसवड, मसाईवाडी, विरकरवाडी मासाळवाडी, पुळकोटी, गंगोती, शिरताव ,देवापूर, पळसावडे ,धुळदेव, हिंगणी या गावातील लोकांनी या शिबिराचा फायदा घेऊन आपल्या मुलांचे व आपले विविध प्रकारचे दाखले काढता येणार आहेत. या अभियानातून विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप करण्यात येणार आहे. तरी सदर गावातील सर्व पालकांनी ग्रामस्थांनी आपल्या मुलांच्या विविध दाखल्यासाठी शिरताव येथे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत उपस्थित राहून दाखले काढून घ्यावेत असे आव्हान शिरतावच्या तलाठी चव्हाण यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!