म्हसवड, वृत्तसेवा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिंपी समाज सातारा जिल्हाध्यक्ष इंजिनिअर सुनील पोरे यांनी अनोख्या पद्धतीने अभिवादन करत समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.

इंजि. पोरे (वय ६३) यांनी मंगळवार, दि. १४ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता आपल्या घरापासून सायकलिंगला सुरुवात केली. सुमारे दीड तासात ५० किलोमीटरचा प्रवास करत ते सकाळी ६.३० वाजता गोंदवले बुद्रुक येथे पोहोचले. तेथे जयभीम युवक ऑर्गनायझेशन आयोजित कार्यक्रमात सहभागी होत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले व त्यांच्या विचारांना वंदन केले.

यानंतर त्यांनी पुन्हा सकाळी ७ वाजता गोंदवलेहून म्हसवडकडे परतीचा प्रवास सुरू केला आणि सुमारे सव्वातासात, म्हणजेच सकाळी ८.३० वाजता ते म्हसवड येथे सुखरूप परतले. एकूण ५० किलोमीटर सायकलिंग करत त्यांनी जयंतीदिनी दिलेले हे अभिवादन सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

विशेष म्हणजे, इंजि. पोरे हे गेल्या १२ वर्षांपासून विविध धार्मिक व सामाजिक स्थळांपर्यंत सायकलिंग करण्याचा छंद सातत्याने जोपासत आहेत. दरवर्षी १४ एप्रिलला गोंदवले बुद्रुक, १० डिसेंबरला शिखर शिंगणापूर तसेच श्रावण महिन्यात पंढरपूर येथे सायकलिंग करून ते आपली सामाजिक व आध्यात्मिक बांधिलकी जपतात.

त्यांच्या या उपक्रमाचे बौद्ध बांधवांसह नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून, बाबासाहेबांच्या विचारांचे आचरण कृतीतून दाखवणारा हा उपक्रम असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!