जोतिष अभ्यासक भरत होसिंग यांना विविध मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली.

कै. भरत होसिंग यांना विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून भावपूर्ण श्रद्धांजली.* *नाशिक येथे शोक सभा संपन्न
मायणी प्रतिनिधी—————
ज्योतिष क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक आणि मार्गदर्शक कै. भरत होसिंग यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी शुक्रवार, दि. १० एप्रिल २०२६ रोजी नाशिक येथे शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि ज्योतिष क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून गुरुजींना यथोचित श्रद्धासुमने अर्पण केली.
या शोक सभेला महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष श्री. अनिल चांदवडकर सर यांनी उपस्थित राहून कै. भरत होसिंग यांच्या कार्याचा गौरव केला. “होसिंग गुरुजींनी आपले संपूर्ण जीवन ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासासाठी आणि प्रसारासाठी वाहिले होते. त्यांच्या निधनाने या क्षेत्रातील एक अभ्यासू आणि निस्पृह व्यक्तिमत्व आपण गमावले आहे,” अशा शब्दांत चांदवडकर सरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे श्री गणेश ठाकूर व विविध पदाधिकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच सहकार भारतीचे प्रदेश संघटक श्री शरद जाधव व पदाधिकारी, पुरोहित संघाचे श्री रविंद्र बडवे गुरूजी, ज्योतिष संस्थाचे चेंबूर, कराड, पुणे, संभाजी नगर, डोंबिवली येथील अध्यक्ष व पदाधिकारी इ.मोठ्या संख्येने उपस्थित होते. कै. भरत होसिंग यांचा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील वावरही अत्यंत प्रभावी होता, याची प्रचिती यावेळी आलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीवरून दिसून आली. तसेच मेल्ट्रॉन मधील त्यांचे माजी सहकारी देखील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित होते.
शोक सभेच्या वेळी कै. भरत होसिंग यांचे कुटुंबीय, आप्तस्वकीय, नातेवाईक आणि श्री रविंद्र बाग, श्री गोविंद शास्त्री, श्रीरामचंद्र जोशी, असा मोठा मित्र परिवार उपस्थित होता. सभेच्या शेवटी सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून मृतात्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना केली. अत्यंत शोकमग्न आणि भावूक वातावरणात ही शोक सभा संपन्न झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
अखेर 'सागर' ची झुंज अपयशी.....    |    इंजिनिअर सुनील पोरे यांचे बाबासाहेबांना अनोखे अभिवादन; ५० किमी सायकलिंगद्वारे जयंती साजरी    |    माणदेशी रेडिओचा श्रोत्यांचा स्नेह मेळावा उत्साहात; मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला सोहळा    |    म्हसवड शहरातील उखरलेले रस्ते तातडीने दुरुस्त करण्याची मागणी.    |    केंद्रप्रमुख नंदकुमार तुपे यांचे कार्य आदर्शवत - विक्रम शिंगाडे.    |    जोतिष अभ्यासक भरत होसिंग यांना विविध मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली.    |    महात्मा फुले यांच्या विचारांचे आचरणच खरी आदरांजली – इंजि. सुनील पोरे    |    शेतकरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दरे मुक्कामी घेतली उपमुख्यमंत्री यांची भेट    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!