म्हसवड….प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शेतकरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दरे मुक्कामी जिल्हा सातारा येथे शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शेतकरी सेना पक्ष संघटन मजबूत करणे व स्थानिक विविध विकास कामाबाबत चर्चा केली.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे तीन दिवसाच्या दौऱ्यानिमित्त त्यांच्या दरे गावी जिल्हा सातारा येथे आले होते. यानिमित्ताने शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालंदर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष श्रीरंग गलगले, जावली शिवसेनातालुका प्रमुख समीर गोळे , शेतकरी सेनेचे जावली तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शेतकरी सेनेच्या माध्यमातून राज्यभरात पन्नास हजार सक्रिय सभासदाची केलेली नोंदणी, शेतकरी सेनेचा पक्ष विस्तार, शेतकरी संपर्क मोहीम, व मजबूत संघटन वाढी साठी केलेल्या कामाची माहिती जालिंदर पाटील यांनी माननीय उपमुख्यमंत्री यांना दिली.

शेतकरी सेनेच्या राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी लवकरच वेळ दिला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिष्टमंडळास दिली. या निमित्ताने माण तालुक्यातील विविध विकासकामा बाबतचे निवेदन प्रा. विश्वंभर बाबर यांनी उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना दिले.

क्षणचित्रे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!