सायगाव येथे दहा एप्रिलला महाराजस्व समाधान शिबिर

(अजित जगताप)
सायगाव दि: सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली असून लोकांना घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. अशावेळी शासकीय दाखले व कागदपत्राची गावातच पूर्तता व्हावी. साठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने दमदार पाऊल उचलले आहे. त्याचाच भाग म्हणून जावळी तालुक्यातील सायगाव येथे दिनांक १० एप्रिल रोजी सकाळी महा राज्यस्व समाधान शिबिर आयोजित केले आहे.

महाराष्ट्र शासन महसूल विभाग छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान – २०२६
आनेवाडी मंडळ विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.
आनेवाडी मंडळातील मेरुलिंग, धनगर पेढा, मोरघर , जावळेवाडी, कदमवाडी, पवारवाडी, दुदुस्करवाडी, मोरेवाडी ,येरुणकरवाडी, महिगाव ,प्रभूची वाडी, सायगाव, रायगाव, खर्शी तर्फ कुडाळ, महमूलकरवाडी, मालुसरेवाडी परिसरातील ग्रामस्थ व नागरिकांना आपल्या महसूल विभागाशी समस्या सोडवण्यासाठी चांगली संधी प्राप्त झालेली आहे.
सातारचे कर्तबगार जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील, महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने शिबीर आयोजित होत आहे. त्याला चांगले यश मिळत आहे.

‘महाराजस्व समाधान शिबिर माध्यमातून महसुली कामे अधिक वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने होत आहे.दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता स्थळ: सायगाव ग्रामपंचायत हॉल (आनेवाडी मंडळातील नागरिकांसाठी सोयीचे ठिकाण होणाऱ्या या शिबिरातील सर्व विभाग सेवा एकाच छताखाली समस्यांचे तात्काळ निराकरण केले जाईल.
१. ७/१२ उतारा व फेरफार: प्रलंबित फेरफार निकाली काढणे व अद्ययावत ७/१२ मिळवणे.
२. अभिलेख दुरुस्ती: जुन्या कागदपत्रांमधील चुकांची दुरुस्ती.
३. शेत रस्ते: शेतातील अडवलेले ‘पाणंद रस्ते’ खुले करणे.
४. दाखले वाटप: शाळा, महाविद्यालय व इतर कामांसाठी आवश्यक दाखल्यांचे वाटप.
५. शेतकरी योजना: पी.एम. किसान तक्रार निवारण व ई-मोजणी मार्गदर्शन.
६. जमीन वर्ग बदल: वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये करण्याची प्रक्रिया.
७. सामाजिक योजना: संजय गांधी निराधार योजना व इतर अर्थसहाय्य योजनांची माहिती मिळणार आहे. या शिबिरासाठी
प्रमुख मार्गदर्शक म्हणून

  • मा. श्री. प्रविण मुदगुल (तहसीलदार, जावली)
  • मा. वैशाली राजमाने (जिल्हा पुरवठा अधिकारी, सातारा)
  • मा. श्री. आशिष बारकुल (उपविभागीय अधिकारी, सातारा)
    उपस्थित राहणार आहेत.
    आनेवाडी मंडळातील सर्व शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. आपल्या तक्रारी आणि कागदपत्रांसह शिबिरास वेळेवर उपस्थित रहा. असे आवाहन करण्यात आले आहे.

फोटो– सायगाव तालुका जावळी येथे राजस्व समाधान शिबिर प्रत्येकात्मक फोटो.. (छाया -बाबू शिवाजी जगताप)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
पुणे जिल्ह्यात शेतकरी सेनेचे संघटन वाढवणार- कृषिरत्न विश्वंभर बाबर    |    17 रोजी शिरताव येथे महा राजस्व अभियान    |    मायणी येथील हनुमंत चव्हाण यांचे निधन    |    शिरताव येथे 17 रोजी महाराजस्व अभियान, सर्व प्रकारचे दाखले मिळणार.    |    क्रांतिवीर सीबीएसई स्कूलचे घवघवीत यश ,समर्थ मंगरुळे प्रथम क्रमांक    |    दहिवडी कृषी कार्यालयातील स्वच्छतागृहांची दुरवस्था    |    आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केली विविध ठिकाणची पाहणी    |    विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान कडून प्रशांत माळवदे यांचा सन्मान    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!