(अजित जगताप).सातारा दि: कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या निर्मितीने खऱ्या अर्थाने जलसिंचन गतीने झाले. साताऱ्यातील कृष्णानगर येथील अधीक्षक अभियंत्यांच्या शासकीय निवासस्थानी अहिंसा पुजारी महावीर जयंती दिनी संगीत नि रंगीत उघडपणे कार्यक्रम झाला. खऱ्या अर्थाने आखाडी साजरी झाल्याची चर्चा सुरू झालेली आहे. मटणाचा आस्वाद घेणाऱ्यांनी मात्र याबाबत मौन पाळणे महत्त्वाचे मानले आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीमुळे खऱ्या अर्थाने साताऱ्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री, पर्यटन मंत्री आणि ग्राम विकास मंत्री असे चार मंत्रिपद असणाऱ्या सातारा जिल्ह्यात प्रशासकीय कारभार गतिमान आहे. तो एवढा गतिमान आहे की, शासकीय निवासस्थानी अहिंसा पुजारी महावीर जयंती दिनी दारूचा महापूर व मटणाचा ढीग अशी आखाडी साजरी झाली. शाकाहारी व मांसाहारी जेवणाचा आस्वाद घेऊन अनेकांनी तृप्तीचे ढेकर दिले. जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता श्री जयंत शिंदे साहेब यांच्या शासकीय निवासस्थानी अगदी मंडप व रोषणाई करून हा अद्वितीय सोहळा पार पडला. विशेष बाब म्हणजे गाव जेवण असल्यासारखे अनेक जण उपस्थित होते. अवकाळी पावसाने गारठलेल्यांना घोटभर उब देण्याचा प्रकार या ठिकाणी राजेरोसपणाने साजरा झाला झाला.
मार्च एंडिंग च्या निमित्ताने एप्रिल फुल नंतर दोन तारखेला महावीर जयंती मुहूर्तावर किती जणांचे बळी गेले? हे सांगणे आता कठीण झाले आहे. होय मी रंगीत नि संगीत ऐकण्यासोबत जेवण घातले? असे सांगण्याचे धाडस आता कोण करणार? हा सुद्धा कळीचा मुद्दा बनला आहे.
जलसंपदा विभागाने अनेक योजना सातारा जिल्ह्यात राबवल्या असल्या तरी प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्याच्या शेतापर्यंत काही पाटबंधारे व धरणाचे पाणी पोहोचले नाही. ही वस्तुस्थिती आहे. असे असताना दारूचा पूर आणि मटणाचा ढीग नेमका कशासाठी ? आणि त्याचा दरवळणारा वास काहीच्या नाकापर्यंत का पोहोचला नाही? हा सुद्धा प्रश्न आहे.

सातारा जिल्ह्यात कृष्णा खोरे विकास महामंडळ खऱ्या अर्थाने १९९५ साली युतीच्या माध्यमातून स्थापन झाले. आता तर भाजपची एकतर्फी सत्ता असल्यामुळे हम करे सो कायदा असा आता वायदा देणारे सत्तेवर आले आहेत. राज्यात शिंदे शाही व साताऱ्यातही शिदेशाही आणि पाटबंधारे विभागातच ही शिंदेशाही अवतरली आहे. आध्यात्मिकेचे झुल पांघरुण नंगानाच सुरू आहे. पोट पूजा करण्यासाठी दुर्गा पूजेचे नाव सांगण्यात येत आहे. अनेक ठेकेदारांचे टक्केवारी या कामी धावून आली आहे. नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या सत्ताधारी व विरोधी पक्षांनी याबाबत आवाज उठवला नाही तरी चालेल कारण, आता सत्ताधारी व विरोधक ही मध्यरेषा पुसट झाली आहे. तरी जनता मात्र या मटणावळी व टक्केवारीचा धूर फार काळ सहन करणार नाही. अशी माहिती काहीही दिली आहे.


फोटो- पाटबंधारे विभागाच्या शासकीय निवासस्थानी आणि उन्हाळ्यात चाललेली मटणावळी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!